ठाणे - ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या कळवा खाडीवर उभारण्यात ( third flyover at Kalwa creek ) येणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम चार डेडलाईन संपल्या तरीही अजून पूर्ण झाले नाही. आता पावसाळ्यानंतर हे संपूर्ण पुलाचे काम पूर्ण होईल असा अंदाज पालिका प्रशासन ( municipal administration on Kalwa flyover ) वर्तवित आहे. जून अखेरीस एक टप्पा पूर्ण होईल असा विश्वास पालिका प्रशासनाने वर्तविला आहे.
ठाणे आणि कळवा तसेच नवी मुंबई या शहरांना जोडण्यासाठी दोन खाडीपूल ( two creeks connecting Thane and Kalwa ) आहेत. त्यापैकी जुना झालेला ब्रिटिशकालीन खाडीपूल ( oldest British creek bridge ) काही वर्षांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर दुसऱ्या खाडी पुलावरून सद्य:स्थितीत वाहनांची वाहतूक सुरू आहे. वाहनसंख्येच्या तुलनेत हा पूल अपुरा पडू लागला आहे. यामुळे ठाणे आणि कळवा भागांत कोंडी होत आहे. ही कोंडी फुटावी तसेच भविष्यातील वाहतुकीचे नियोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेने येथे तिसरा खाडी पूल ( Thane Municipal Corporation third creek bridge ) उभारण्यात येत आहे. मात्र, गेली दोन वर्षे हा पूल रखडत होता. डिसेंबर २०१९मध्ये या पुलाच्या कामास डिसेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, कोरोना टाळेबंदीमुळे पूल उभारणीची कामे रखडली. आता या पुलाची 89 टक्के कामे पूर्ण झाले आहे. त्यापैकी केवळ 11 टक्के कामे शिल्लक आहे.
निधीची तरतूद-पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जुन्याच रखडलेल्या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये कळवा तिसरा खाडी पुलाच्या कामाचाही समावेश आहे. या पुलाच्या कामाचा एकूण खर्च १८७.३६ कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये यापूर्वीच ठेकेदाराला पालिकेने दिले आहेत. तर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ९ कोटी ९२ लाख, जानेवारीत ४ कोटी ३६ लाख आणि फेब्रुवारी महिन्यात ३ कोटी ८३ लाख रुपये ठेकेदाराला दिले आहेत. याशिवाय, ४ कोटी ५७ लाख रुपये मार्च महिन्यात देण्यात येणार असून उर्वरित ३९ कोटी ५२ लाखांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.
चार वेळा डेडलाईन संपूनही अपूर्ण काम-कळवा खाडीवर २.२ कि.मी लांबीचा सिलिंक बांधण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे . २०१४ साली सुरू झालेल्या या पुलाचे २०१७ साली 36 महिन्यात पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, त्यानंतर पाच वर्षे होऊन गेले तरी तारीख ते तारीख सुरू आहे. मार्च २०१८ त्यानंतर सप्टेंबर २०१९ नन्तर डिसेंबर २०१९ चा वायदा करण्यात आला होता. मग गेल्या वर्षीच्या ऑगस्ट 2021 महिन्यात ब्रिज वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगण्यात येत होते. आता मे 15 2022 ही डेडलाईनदेखील पुढे ढकलली आहे. जून 2022 पर्यंत एक मार्गिका खुली करण्याची पाचव्यांदा डेडलाईन मिळाली आहे.