महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'त्या' वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण - thane news

'अल्लाहने सोच के रखा था २०११ में की २०१९ मे कोव्हिड आएगा, इसलिए २०११ मे कब्रस्तान को सँक्शन मिला', असे वादग्रस्त वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यातील एका कार्यक्रमात केले होते.

jitendra-awhads-explanation-on-the-controversial-statement
जितेंद्र आव्हाड

By

Published : Feb 21, 2021, 10:20 PM IST

ठाणे - 'अल्लाहने सोच के रखा था २०११ में की २०१९ मे कोव्हिड आएगा, इसलिए २०११ मे कब्रस्तान को सँक्शन मिला', असे वादग्रस्त वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यातील एका कार्यक्रमात केले होते. आज यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.

'त्या' वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण

मुंब्रा भागात कब्रस्थान नसल्याने मोठी अडचण होत होती. मात्र राज्य शासनाने मान्यता देत पाहिलं २०११ साली मुंब्रात कब्रस्थान निर्माण केले. विशेष म्हणजे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मुंब्रात रुग्ण वाढत असताना रोज कोरोनाने ३० ते ४० मृत्यू होत होते. त्यामुळे मागचा इतिहास पाहता कब्रस्थान नसते, तर मुंब्राची अवस्था अत्यंत वाईट असती, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले. ते अंबरनाथच्या कार्यकर्ते मेळाव्यात आले बोलत होते.

दफनभूमी उद्घाटनाच्या वेळी केले होते वक्तव्य-

मुब्र्यांतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना शेख यांनी दफनभूमी उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात आव्हाड बोलताना म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून या दफनभूमीचा विषय प्रलंबित होता. यासाठी अनेक आंदोलनेही झाली होती. अखेर याची पूर्तता झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. त्यावेळी अल्लाहने सोच के रखा था २०११ में की २०१९ मे कोव्हिड आएगा, इसलिए २०११ मे कब्रस्तान को सँक्शन मिला, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री आव्हाड यांनी केल्याने त्यांच्यावर विरोधकांनीही टीकेची झोड उठवली होती.

हेही वाचा-मुंबई : टॅक्सी व रिक्षा भाडेवाढीसंदर्भात उद्या एमएमआरटीएची बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details