मुंबई- मंत्रालयात बसून प्रकल्पांची माहिती घेता येत नाही. त्यामुळे विकासकामांची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी जाणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असा अप्रत्यक्ष टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला ( Jitendra Awhad visit Patra Chawl ) लगावला. गोरेगाव पश्चिम पत्रा चाळला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. भाजपच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री मंत्रालयात येत नसल्याची टीका केली जाते.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad on Patra Chawl ) म्हणाले की, पत्रा चाळमधील रहिवाशांसाठी चांगल्या इमारती बांधण्यात याव्यात. पत्रा चाळच्या ६७२ कुटुंबांच्या घरांच्या कामाचे उद्या उद्घाटन ( Inauguration of homes for Patra Chawl ) होणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा-Chandrakant Patil Statement On Sanjay Raut : 'संजय राऊत यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे'
महाराष्ट्र पोलिसांसाठी १० टक्के घरे राखीव
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी म्हाडाची बहुप्रतिक्षित योजना सिद्धार्थनगर, गोरेगाव पश्चिम येथील पत्रा चाळला भेट दिली. सुमारे १२ वर्षांपासून रखडलेल्या पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना देण्यात आला आहे. तर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तर महिनाभरानंतर आव्हाड स्वत: या प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या कामाचा लेखाजोखा घेणार आहेत. त्याचबरोबर म्हाडाकडून निघणाऱ्या लॉटरीत महाराष्ट्र पोलिसांसाठी १० टक्के घरे राखीव ठेवण्यात येणार ( reserve homes for Maharashtra Police ) असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.