महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गरीब की जान क्या जान नही होती शेठ?आव्हाडांनी केला सवाल; रेल्वेमंत्र्यांनी दिले होते आव्हाडांना नागरिकांना घरे न हटविण्याचे आश्वासन - दिवा पाचवा सहावा रेल्वे लाईन मार्गिका

दिव्याच्या पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या (Dive 5 and 6th railway route) उद्घाटनासाठी रेल्वेमंत्री अश्विनी कुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे (Railway Minister in Thane) ठाण्यात आले होते. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेत रेल्वे लाईन लगतच्या रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा, अशी मागणी केली.

dsfds
sdfsdf

By

Published : Mar 4, 2022, 8:04 PM IST

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील कळवा -मुंब्रा-दिवापासून ते थेट कल्याण-कर्जतपर्यंत रेल्वेशेजारी घरे हटविण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले होते. तशी कारवाईही रेल्वे अधिकार्‍यांनी सुरू केली होती. दरम्यान डॉ. जितेंद्र आव्हाड व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आंदोलनानंतर व रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानंतर ही कारवाई मागे घेतली आहे. या रहिवाशांचे योग्य ठिकाणी स्थलांतर केल्यानंतरच रेल्वेचा हा परिसर रिकामा करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांनी दिले होते.

आव्हाड, दानवे रेल्वेमंत्र्यांची भेट

मात्र, आज मध्य रेल्वेच्या मार्गातील या रहिवाशांना आज रेल्वेचे अधिकारी घरे खाली करण्यासाठी धमकावत असल्याने डॉ. जितेंद्र आव्हाड आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिलेल्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असे म्हणत “गरीब की जान क्या जान नही होती शेठ?” असा सवाल गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर केला आहे.

रेल्वे अधिकार्‍यांनी घरे खाली करण्याचे दिले आदेश

दिव्याच्या पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या उद्घाटनासाठी रेल्वेमंत्री अश्विनी कुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे ठाण्यात आले होते. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेत रेल्वे लाईन लगतच्या रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा. मगच ही जागा रिकामी करा. म्हाडामार्फत या रहिवाशांना आजुबाजूच्या परिसरात नव्याने पुनर्वसन करून घरे देता येतील. त्यासाठी रेल्वेनेही सहकार्य करण्याची मागणी गृहनिर्माणमंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यावेळी रेल्वेमंत्री अश्विनीकुमार व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सकारात्मकता दर्शविली होती. तसेच जोपर्यंत रहिवाशांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ना. आव्हाडांच्या मागणीला केराची टोपली दाखवत रेल्वे अधिकार्‍यांनी रेल्वे लाईन परिसरातील घरे खाली करण्याचे आदेश देत रहिवाशांना धमकावण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जितेंद्र आव्हाड ट्वीट

गरीब लाचार नसतो
दरम्यान, रेल्वेच्या अधिकार्‍यांनी यापूवीर्ही रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी तगादा लावला होता. त्यावेळी “गरिबीचा अंत पाहू नका. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणार्‍या लाखो गरिबांना घरे खाली करण्याच्या नोटीस दिल्या आहे. केंद्र सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. नाहीतर 10 झोपडपट्टीवासियांनी जर ठरवलं तर पूर्ण भारतातील रेल्वे बंद होऊन जाईल. गरीब लाचार नसतो. तर लढाऊ असतो.” असे ना. डॉ. जितेंद्र आव्हाडांनी ठणकावले होते. आज रेल्वेच्या अधिकार्‍यांनी पुन्हा एकदा रेल्वे लाईन परिसरातील रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी धमकावल्याने ना. डॉ. जितेंद्र आव्हाडांनी “उद्या रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका,’ असा इशारा रेल्वेमंत्री अश्विनीकुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वे अधिकार्‍यांना दिला आहे.

हेही वाचा -Central Railway : भारतीय रेल्वेमध्ये पार्सल उत्पन्नात मध्य रेल्वेचा पहिला नंबर

ABOUT THE AUTHOR

...view details