महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Invitation To CM To Worship Vitthal : मुख्यमंत्री शिंदेंना आषाढीला विठ्ठल पुजेचे निमंत्रण, वारकरी फेटा, विणा देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान - Invitation To CM Eknath shinde To Worship Vitthal on Aashadhi

यावर्षीची आषाढीची विठ्ठल पूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या हस्ते होणार आहे. प्रोटोकॅालनुसार आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रखुमाई पुजेचे निमंत्रण घेवून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे ( Shri Vitthal Rukmini Temple Committee ) सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ठाण्यातील मुख्यमंत्री निवासस्थानी आले होते. यावेळेस विठ्ठलाची मानाची पगडी, विणा, विठ्ठल रखुमाईंचा फोटो, तुळशी माळ आणि टोपी मुख्यमंत्र्यांना देऊन समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

vitthal rukmini
vitthal rukmini

By

Published : Jul 5, 2022, 8:22 PM IST

ठाणे :श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ दीप या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या पुजेसाठी नक्की उपस्थित राहू आणि पंढरपूर मंदिर समितीला लागेल ती मदत करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढीच्या पुजेचे निमंत्रण

आषाढी पुजेची परंपरा - दरवर्षी आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठलाची पूजा करण्याची राज्यात परंपरा आहे. त्याशिवाय दर्शन रांगेतील पहिल्या वारकऱ्यासह या पूजेला बसण्याचा मान दिला जातो. या वारकऱ्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यथोचित सत्कार केला जातो. आज मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यास आलेल्यांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी श्री गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा -Maharashtra Live Update : मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईच्या पावसाचा आढावा; खबरदारी घेण्याचे केले आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details