ठाणे -भारतीय सैन्यदलातील एका जवानाने 31 वर्षाच्या महिलेशी फेसबुकवर मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर आरोपीने स्वत: विवाहित असतानाही पीडित महिलेला लग्न न झाल्याचे सांगितले. तसेच तिला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक परीट असे संबंधित आरोपीचे नाव आहे. तो भारतीय सैन्यदलात जवान आहे.
खळबळजनक ! फेसबुकवर मैत्री झालेल्या महिलेवर जवानाचा बलात्कार - rape in thane
भारतीय सैन्यदलातील एका जवानाने 31 वर्षाच्या महिलेशी फेसबुकवर मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच तिला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार महिला कोळीवाडा परिसरात राहत असून ती मुंबईत नोकरी करते. तर आरोपी विनायक कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील वास्तव्यास असून आसाम राज्यात कार्यरत आहे. ऑगस्ट 2019 साली फेसबुकच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. यानंतर त्यांची मैत्री होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
काही दिवसांसाठी आरोपी सुट्टीवर आला होता. यावेळी त्यांने पीडितेवर शारिरक अत्याचार केले. तसेच अविवाहित असल्याचे भासवले. पीडितेला संबंधित आरोपीचे लग्न झाल्याचे कळताच आपला विश्वासघात करून फसवणूक केल्याचे तिला जाणवले. यानंतर पीडितेने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विनायक विरोधात भादंसं कलम ३७६, ४१७, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला सह पोलीस निरिक्षक एस.एस.पाटील करत आहेत.