ठाणे - परतीच्या पावसाने झालेल्या नूकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमतीत चढ-उतार सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात भाजी विक्रेत्यांकडून सरार्स ग्रहकांची लूट सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली असल्याचे कारण देत भाज्यांचे दर प्रचंड प्रमाणात वाढवण्यात आले आहेत. त्याची झळ ग्राहकांना बसत आहे.
ठाण्यात भाज्यांचे दर शंभरीपार, भाजी विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट - अतिवृष्टीचा भाजीपाल्याला फटका
परतीच्या पावसाने झालेल्या नूकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमतीत चढ-उतार सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात भाजी विक्रेत्यांकडून सरार्स ग्रहकांची लूट सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली असल्याचे कारण देत भाज्यांचे दर प्रचंड प्रमाणात वाढवण्यात आले आहेत. त्याची झळ ग्राहकांना बसत आहे.
घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी भाज्यांचे दर किलोमागे तब्बल 20 ते 25 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे भाज्यांच्या दराने शंभरी पार केल्याचे चित्र आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने याचा मोठा फटका ग्राहकांना बसतो आहे. मुंबई, ठाणे तसेच उपनगरातील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक महिनाभरापूर्वी घटल्याने, घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती. काही काळानंतर भाज्यांची आवक स्थिरावल्याने घाऊक बाजारातील दर नियंत्रणात आले. मात्र अ्दयापही किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजीचे दर कमी केलेले नाहीत.
घाऊक भाजी बाजारात ३० ते ३५ रुपये किलो दराने मिळणारा कोबी किरकोळ विक्रेते ८० रुपयांना विकत आहेत. 30 ते 65 रुपये किले दराने मिळणाऱ्या फ्लॉवर, गवार, शिमला मिरचीसारख्या भाज्यांचे दर किरकोळ भाजीमार्केटमध्ये शंभरीपार पोहचल्याचे ग्राहकांनी सांगितले. दरम्यान भाज्यांचे दर गगणाला भिडल्यामुळे सध्या ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडतांना दिसून येत आहे.