महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात दुसऱ्या लॉकडाऊनदरम्यान बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ; 'या' झाेनमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद - ठाणे गुन्हे वार्ता

राज्यात महिला अत्याचाराविरोधात जनजागृती करत पोलीस प्रशासनाकडून महिलांचे सरंक्षण करण्याची हमी दिली जाते. मात्र, दुसऱ्या कॉलडाऊनमध्ये बलात्कारांच्या घटनांत कमालीच्या वाढ झाली आहे.

thane rape cases increased news
thane latest news

By

Published : Jul 10, 2021, 5:54 PM IST

Updated : Jul 10, 2021, 7:15 PM IST

ठाणे - दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर देशभर संपाताची लाट पसरली होती. त्यानंतर बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, यासंबंधीचा कठोर कायदा व्हावा, या मागणीसाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. तसेच राज्यात महिला अत्याचाराविरोधात जनजागृती करत पोलीस प्रशासनाकडून महिलांचे सरंक्षण करण्याची हमी दिली होती. मात्र, ठाण्यात दुसऱ्या कॉलडाऊनदरम्यान बलात्कारांच्या घटनांत कमालीची वाढ झाल्याचे बघायला मिळते आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालय क्षेत्रातील पाच झोन असून या झोनमध्ये १२७ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये १२७बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद -

दुसऱ्या लॉकडाऊन काळात नराधमांनी जिल्ह्यातील विविध शहरात जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत बलात्काराच्या गुन्ह्यांत कमालीची वाढ झाल्याचे विविध पोलीस ठाण्याच्या नोंदीवरून दिसून आले आहे. जिल्हा पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ५ पोलीस परिमंडळ असून यामध्ये एकूण ३५ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्यातच गेल्या वर्षी मार्च महिन्यात कडक लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक गंभीर गुन्हे होण्याचे प्रमाण घटले होते. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये १२७ गुन्ह्यांपैकी ११८ गुन्ह्यातील नराधमांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

हेही वाचा -VIDEO खांद्यावर हात ठेवताच काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी कार्यकर्त्याला मारली थप्पड

सर्वाधिक बलात्कारांचे गुन्हे कल्याण झोनमध्ये -

ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालय क्षेत्रात शहरी भाग मोठ्या प्रमाणात असून यामध्ये पाच पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालय आहेत. यापैकी जानेवारी ते मे २०२१दरम्यान म्हणजे पाच महिन्यांत सर्वाधिक बलात्कारांचे गुन्हे कल्याण झोन ३मध्ये, तर सर्वात कमी गुन्हे झोन ५मध्ये घडल्याचे दिसून आले. ठाणे जिल्ह्यातील पाच पोलीस उपआयुक्त परिमंडळापैकी परिमंडळ १मध्ये २९ बलात्कारांचे गुन्हे, तर परिमंडळ २मध्ये १९ गुन्हे, परिमंडळ ३मध्ये ३८ गुन्हे, परिमंडळ ४मध्ये २४ गुन्हे, आणि परिमंडळ ५मध्ये १७ गुन्हे, असे एकूण १२७ बलात्कारांचे गुन्हे घडले आहे. यापैकी सर्वाधिक गुन्हे कल्याण परिमंडळ ३मध्ये घडले असून पहिल्या लॉकडाऊनच्या पाच महिन्यांच्या काळात २२ गुन्हे घडले होते. मात्र, जानेवारी ते मे २०२१ दरम्यान दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये वाढ होऊन ३८ गुन्हे घडल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ४० टक्के बलात्कारांच्या गुन्ह्यांत वाढ -

पहिल्या लॉकडाऊनमध्ये पाच महिन्यात ७७ पीडितांवर अत्याचारांच्या घटना घडल्या होत्या. यापैकी विविध पोलीस ठाण्यातील नोंद असलेल्या गुन्ह्यातील ७१ नराधमांना अटक केली. मात्र, मागील वर्षाच्या गुन्ह्यांच्या तुलनेत यावर्षीच्या जानेवारी ते मे २०२१ या पाच महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढून त्यामध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले.

कोरोनाचा संसर्ग पसरण्याच्या भीतीने न्यायालय बंद -

पहिल्या लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यातच कोरोनाचा फैलाव पसरण्याच्या भीतीने न्यायलये बंद होती. आता दुसऱ्या लॉकडाऊनसह अनलॉक काळात न्यायालय पुन्हा सुरु करण्यात आले. मात्र, गंभीर गुन्ह्यांतील दावे काढण्यात न्यायालयाने भर दिल्याने न्यायालयातही मोठ्या प्रमाणात कामकाज वाढले. त्यातच बलात्कारांच्या घटनेतील पीडितांना आरोपींची ओळख परेडसाठी न्यायालयात जावे लागते. त्यामुळे कधी कधी त्यांनाही बराच वेळ न्यायालयात द्यावा लागत असल्याचे एका पीडितेने सांगितले. विशेष म्हणजे बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्याची व्याप्ती पाहता विविध पोलीस ठाण्याच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच खबऱ्यांचे जाळे पसरवून १२७ गुन्ह्यांतील नराधामांपैकी ११८ गुन्ह्यांतील नराधमांच्या मुसक्या आवळ्यात यश आले आहे.

हेही वाचा -शिवसेनेने मंत्रीपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये - आमदार भास्कर जाधव

Last Updated : Jul 10, 2021, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details