ठाणे - मुंब्रा पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या दुकानाच्या मालमत्तेच्या वादातून बाप आणि मुलाच्या भांडणात लहान मुलगा मनोज चौरासिया याने पोलिसांसमोर स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. अत्यवस्थ मनोज चौरसिया याला केइएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
हेही वाचा -Thane Crime News : भावजयच्या साडे सहा लाखांच्या दागिन्यांवर नणंदने मारला डल्ला
याबाबतची हकीकत अशी की, मुंब्रा परिसरात अर्जुन चौरसिया यांचे दुकान आहे. या दुकानाच्या कब्जाबाबत अर्जुन चौरसिया आणि दोन मुले अशोक आणि मनोज यांच्यात वाद होता. सदर प्रकरणी अर्जुन चौरसिया याने काही लोकांना हाताशी धरून दुकानाचा ताबा दुसऱ्याला दिला. वाद हा सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकटेश आंधळे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी कायदेशीर कार्यवाही कारून प्रकरण दिवाणी न्यायलयात पाठविले होते. दिवाणी न्यायलयात प्रकरण सुरू आहे. दरम्यान पिता अर्जुन आणि लहान मुलगा यांच्यात पुन्हा दुकानाच्या कब्जाबाबत वाद शनिवारी उफाळून आला. दरम्यान लहान मुलगा मनोज याने दुकानात घुसून तोडफोड करीत दुकानात आलेल्या पोलिसांसमोरच स्वतःवर रॉकेल टाकून पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मनोज हा जास्त भाजला. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला मुंबईच्या केइएम रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे.