ठाणे -येथे घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच मालकाच्या कपाट ठेवलेल्या १३ लाख रोकडवर डल्ला मारून फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरमधील कँम्प नंबर पाच मधील अमित महल येथे घडली आहे. याप्रकरणी मोलकरणीवर हिललाईन पोलीस ठाण्यात रोकड चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सुरेखा सुनील जाधव (वय ३०, रा. गणेशनगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणीचे नाव आहे.
Theft incident in Thane: ठाण्यातील घटना! मोलकरणीने मालकाच्या घरातून लंपास केले १३ लाख रोकड - ठाण्यातील चोरीची घटना
येथे घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच मालकाच्या कपाट ठेवलेल्या १३ लाख रोकडवर डल्ला मारून फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरमधील कँम्प नंबर पाच मधील अमित महल येथे घडली आहे. याप्रकरणी मोलकरणीवर हिललाईन पोलीस ठाण्यात रोकड चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सुरेखा सुनील जाधव (वय ३०, रा. गणेशनगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणीचे नाव आहे.
![Theft incident in Thane: ठाण्यातील घटना! मोलकरणीने मालकाच्या घरातून लंपास केले १३ लाख रोकड हिललाईन पोलीस स्टेशन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16126748-528-16126748-1660736059996.jpg)
मोलकरणीचा शोध सुरु -उल्हासनगर शहरातील कॅम्प पाच परिसरात अमित महलमध्ये कैलाश भिषमदास मोहानी (वय ४९) हे कुटंबासह राहत असून त्यांचा मारबल विक्रीचा व्यवसाय आहे. मोलकरीण सुरेखा नेहमी त्यांच्या घरी कामासाठी नियमितपणे येत होती. त्यातच ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट रोजी घरमालक कैलाश यांच्या बेडरूम मधील कपाटात १३ लाखांची रोकड ठेवली होती. याच दरम्यान कपाटातील रोकड चोरीला गेल्याची त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मोलकरणीच्या घरी जाऊन तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. अखेर १६ ऑगस्ट रोजी कैलाश यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेत १३ लाख रोकड घरातील कपाटातून चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी मोलकरणीचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वगरे करीत आहेत.
हेही वाचा -Aurangabad Crime औरंगाबादमध्ये प्रियकरकाडून प्रियसीची गळा चिरून हत्या