ठाणे -ठाण्यात एकीकडे अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असताना पालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या हातावरील बोटांवर चाकूने हल्ला झाला असून त्यांची बोटे छाटल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पिंपळे यांना तत्काळ घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे. दरम्यान, अमरजीत यादव असे या हल्लेखोर भाजी विक्रेत्याचे नाव आहे. या घटनेमुळे ठाण्यातील फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -ठाणे-दिवा पाचव्या -सहाव्या मार्गिका डिसेंबर अखेरपर्यत होणार पूर्ण
गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे मनपाची कारवाई -
ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे, तसेच फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, तसेच हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत प्रभाग समितीनिहाय अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर धडक कारवाई सुरू असून, शहरात विविध ठिकाणी कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. दरम्यान, घोडबंदर रोड येथे सोमवारी संध्याकाळी अशीच कारवाई सुरू असताना सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे याच्यावर अमरजीत यादव या भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात कल्पिता पिपळे यांची तीन बोटे छाटली गेली असून गंभीर दुखापत झाली आहे. तर, सुरक्षारक्षकाच्या ऐका बोटाला दुखापत झाली आहे.
हल्लेखोराला अटक -