ठाणे -राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाने बनावट दारू प्रकणात धडक कारवाई केली आहे. गोव्यातील विविध विदेशी दारूचा बनावट साठा घेऊन येणाऱ्या टेम्पो ट्रकसह 28 लाख 78 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. तर एका तस्कराला अटक केली आहे. दीपक तेजराव बोरडे (26) असे अटक केलेल्या दारू तस्कराचे नाव आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरून अवैधरित्या बनावट विदेशी मद्याची तस्करी केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कल्याण - शीळ मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला सापळा रचला. कल्याण शीळ मार्गावर असलेल्या आर्या लॉजच्या समोरच एका टेम्पोमध्ये विदेशी बनावट दारूच्या बाटल्या होत्या. विविध कंपनीच्या 1 लाख 80 हजार रुपयांच्या व्हिस्कीच्या बाटल्या आणि 1 लाख 65 हजारांचा टेम्पो असा 3 लाख 45 मुद्देमाल उत्पादन शुल्काने जप्त केला आहे. यावेळी पथकाने दीपक बोरडेकडे चौकशी केली असता त्याने उसरघरमधून विदेशी दारूचा साठा भरल्याचे सांगितले.
हेही वाचा-रिक्षाचालकाचा शोध लागला अन् महिलेचा जीव भांड्यात पडला...