ठाणे - अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी एका तरुणाला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीने संबंधित विद्यार्थिनीसोबत केबिन बनवलेल्या एका स्नॅक्स सेंटरमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी स्नॅक्स सेंटर चालकालाही बेड्या ठोकल्या आहे. संदेश साबळे (वय-21) असे आरोपीचे नाव असून, लल्लन शाह असे स्नॅक्स सेंटरमध्ये शारीरिक सुखाचा गोरखधंदा चालवणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी उल्हासनगरच्या एका सुप्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्या राहत्या घरासमोर असलेल्या एका जिन्स कारखान्यात आरोपी संदेश कामाला होता. आरोपीने त्या अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनतर ते दोघेही महाविद्यालय सुटल्यावर मराठा विभाग येथील उद्यानात भेटायचे. त्यांची जवळीक वाढल्यानंतर शारीरिक सुख घेण्यासाठी त्यांनी चांदीबाई महाविद्यालयाच्या शेजारी असलेले 'ओम साई राम कोल्ड्रिंक्स-स्नॅक्स कॉर्नर' गाठले. त्या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीसाठी बंद केबिन तयार करण्यात आले असून यामध्ये एका तासासाठी 200 ते 300 रुपये स्नॅक्स सेंटर चालकाकडून आकारण्यात येतात.