ठाणे :उल्हासनगरमधील एका जीन्स कारखान्यात छापा टाकल्यानंतर विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. कारखान्यातील तळघरात दमण व गोवा यांसाख्या प्रदेशातून आणलेल्या 67 हजार किंमतीचे मद्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. या साठ्याची विक्री होण्याआधीच तो हिल लाईन पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी तीन दारू तस्करांना अटक करण्यात आली आहे. राकेश रामरख्यानी, यश गंगवाणी, बंटी उर्फ भानू अशी आरोपींची नावे आहेत.
जीन्स कारखान्याच्या तळघरात विदेशी मद्यसाठा; गुप्त माहिती मिळताच पोलिसांचा छापा - illegal liquor in thane
उल्हासनगरमध्ये कारखान्यातील तळघरात दमण व गोवा यांसाख्या केंद्रशासित प्रदेशातून आणलेले 67 हजार किंमतीचे मद्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. या साठ्याची विक्री होण्याआधीच तो हिललाईन पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे.
उल्हासनगरमध्ये कारखान्यातील तळघरात दमण व गोवा यांसाख्या केंद्रशासित प्रदेशातून आणलेले 67 हजार किंमतीचे मद्य पोलिसांनी हस्तगत केले आहे.
महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असणारे मद्य उल्हासनगरच्या कॅम्प पाच नेहरू नगर गार्डन समोर असलेल्या एका जीन्स कारखान्यातून हस्तगत करण्यात आले. यासंबंधी पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सायंकाळच्या सुमारास संबंधित जीन्स कारखान्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी तळघरात लपवून ठेवलेला विदेशी मद्याचा साठा पोलिसांना अढळला. याची किंमत 67 हजार रुपये आहे. यासंबंधी अधिक तपास सुरू आहे.