ठाणे :राज्याच्या राजकारणात सत्ता परिवर्तन झाले असताना शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघेच्या मृत्यूची चर्चा ( Anand Dighe death case ) सुरू झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या या चर्चेमुळे अनेकांचे मनात प्रश्न पडला असून दिघेंच्या मृत्यचे गूढ ( suspect of Anand Dighe death case ) नेमके काय होते? याचा विचार आता ठाण्यातील जनता करू लागली आहे. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Shindes speech on Anand Dighe ) यांनी मालेगावमधील भाषणात मी मुलाखत दिली तर देशात भूकंप होईल अशी गर्जना करत प्रथमच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, शिंदे यांनी जाहीर भाषण करताना आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. याबाबत खासदार राजन विचारे यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांना पत्र लिहले ( MP Rajan Vichares emotional letter to Anand Dighe ) असून या पत्रात विचारे भावनिक होताना दिसून आले आहेत.
आज तुमची आठवण येतेय साहेब !-दरम्यान शिवसेनेसोबत असलेले ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी खऱ्या अर्थाने सक्रिय होते. खासदार विचारे यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांना पत्र लिहले असून या पत्रात विचारे भावनिक होताना दिसून आले आहेत. "साहेब आज मी जितका अस्वस्थ आहे ..तितका कधीच नव्हतो ..कारण आज एक अशी घटना घडलीये ज्या घटनेमुळे फक्त मीच नाही, शिवसैनिकच नाही तर एक शिवसेना बघितलेला सर्व सामान्य मराठी माणूस सुद्धा अस्वस्थ झालाय. आता तुम्हाला कुठल्या तोंडानं सांगू घात झाला दिघे साहेब घात झाला ! तो पण आपल्याच लोकांकडून. म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब. अश्या शब्दात राजन विचारेंनी आपले मन मोकळे केले आहे आणि आम्ही फक्त शिवसेनेसोबत असल्याची घ्यावी खासदार राजन विचारे यांनी यानिमित्ताने दिली आहे. दरम्यान धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मे महिन्यात रिलीज झालेल्या चित्रपटाचा पुढचा रिमेक राज्याच्या राजकारणात सुरु झाला असल्याची चर्चा ठाण्यात सुरु झाली आहे.
दिघेंच्या मृत्यू संदर्भात संशय बळावला -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान करून एकप्रकारे ठाण्यातील राजकारण ढवळून निघाले असून दिघेंच्या मृत्यू संदर्भात अनेकांचा संशय बळावला आहे. दरम्यान आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी दिघेंबद्दल काय घडलं हे माहित होतं तर गप्पा का बसलात ? २५ वर्षे गप्प बसून ठाणेकर आणि दिघे साहेबांशी खरी प्रतारणा तुम्ही केली आहे, सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाणार, असे ट्विट करत त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.