ठाणे -माहेरी गेलेल्या पत्नीने व्हिडिओ कॉलवर मुलीचा चेहरा दाखवला नाही. या नैराश्येतून पतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या (Man suicide in badlapur) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना धुलीवंदनाच्या दिवशीच बदलापुरात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात (Badlapur Police station) अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. शंकर जाधव (३२) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी पत्नीचा सासरी येण्यास नकार-
बदलापूरच्या वडवली परिसरात मृत शंकर जाधव हा वडील, आई, पत्नी आणि २ महिन्याच्या लहान मुलीसह राहत होता. मात्र, पतीने आई-वडिलांसोबत न राहता वेगळे राहावे अशी शंकरच्या पत्नीचे म्हणणे होते. यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते, असे मृत शंकरच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी यावरूनच वाद झाला आणि शंकरची पत्नी २ महिन्याच्या मुलीला घेऊन माहेरी गेली होती. दुसरीकडे होळीच्या सणानिमित्त तरी पत्नी मुलीला घेऊन घरी येईल असे शंकरला वाटले होते. मात्र पत्नी आली नाही. तसेच तिने व्हिडिओ कॉलवर मुलीचा चेहरा दाखवायला नकार दिला. त्यानंतर शंकरने पत्नीला फोन करून मुलीला घरी घेऊन ये असे सांगितले, मात्र, पत्नीने तुम्ही घ्यायला या म्हणत नंतर मात्र येण्यास नकार दिला.
पत्नीला फोन करून केली आत्महत्या -
मुलीचा चेहराही दाखवला नाही. तसेच पत्नी घरी आली नाही म्हणून मृत शंकरने पत्नीला आत्महत्या करत असल्याचा शेवटचा फोन करत राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली. ऐन धुलीवंदनाच्या दिवशी बदलापुरात हा प्रकार घडल्याने वडवली भागात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, नैराश्येच्या भरात टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण कुटूंब उद्धव्सत झाले आहे.