महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पतीकडून पत्नीचा व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह स्टेट्स ; पोलिसात तक्रार केल्यानंतर तोंडावर फेकले अॅसिड - etv bharat maharashtra

15 दिवसापूर्वी पवनने स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेस्ट्सवर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो ठेवले होते. त्यामुळे पत्नीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे रागातून पवनने पत्नीशी भांडण केले.

पनवेल पोलीस ठाणे
पनवेल पोलीस ठाणे

By

Published : Nov 9, 2021, 4:55 PM IST

नवी मुंबई (ठाणे) -पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हॉटसअप स्टेटसवर ठेवल्याने पत्नीने तक्रार केली. या रागातून पतीने चक्क पत्नीच्या तोंडावर अँसिड फेकल्याची धक्कादायक घटना पनवेल नजीकच्या करंजाडे वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी अॅसिड फेकून पळालेल्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. पवन पाटील (39) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.



पवन पाटील (39) हा पनवेल परिसरातील बोर्ले गावात राहत होता. त्याची 36 वर्षीय पत्नीबरोबर पटत नव्हते. कौटुंबिक वादामुळे पवनची पत्नी ही त्याच्यापासून विभक्त राहून करंजाडे येथील सेक्टर 2 मध्ये राहत होती.

हेही वाचा-देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या बॉम्बस्फोटानंतर मलिकांचा स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न - प्रवीण दरेकर

पत्नीचे व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह ठेवले होते स्टेट्स

15 दिवसापूर्वी पवनने स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेस्ट्सवर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो ठेवले होते. त्यामुळे पत्नीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे रागातून पवनने पत्नीशी भांडण केले.

हेही वाचा-...तर एसटी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार

पत्नीच्या तोंडावर फेकले अँसिड

पवनने व्हाट्सअप स्टेटसवर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो ठेवल्याने त्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात पत्नीने दाखल केली. या गोष्टीचा पवनला खूप राग आला. रागाच्या भरात पवन हा पत्नी राहत असलेल्या ठिकाणी गेला. तिच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिकच्या बाटलीतून आणलेले अॅसिड फेकले. तेथून त्वरित पळ काढला.

हेही वाचा-ST Bus Strike : संप बेकायदेशीर, अवमान याचिका दाखल करणार - परब

पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला केले गजाआड

पत्नीच्या तोंडावर अॅसिड फेकून पळालेला पवन हा झायलो गाडीने पनवेल परिसरातील पळस्पे येथे येणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलीस पथकाने पवन याला अटक केले. संबंधित आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 11 तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवळे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details