महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंब्र्यात सदनिकेला भीषण आग, अग्नीशमन दलाकडून आग अटोक्यात - huge fire broke out in mumbra

ठाण्यातील मुंब्र्यात सायंकाळच्या सुमारास एका सदनिकेला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्नीशमन दलाकडून आग अटोक्यात

fire broke out in a house in Mumbra
मुंब्र्यात सदनिकेला भीषण आग

By

Published : Jan 30, 2020, 10:42 PM IST

ठाणे - मुंब्रा येथे सायंकाळच्या सुमारास एका सदनिकेला भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

मुंब्र्यात सदनिकेला भीषण आग

हेही वाचा... पनवेल-ठाणे मार्गावरून धावली पहिली एसी लोकल, रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंब्रा येथे मोमीन सोसायटीत चौथ्या मजल्यावर अझीझ मुल्ला यांच्या घरात गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये मुल्ला यांच्या घरातील फर्निचर आणि आदी चीड वस्तूंचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या आणि एक बचाव पथकाचे वाहन तसेच 1 पाण्याचा टँकर दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. स्थानिक पोलीस आणि एमएसईबीचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सदरची घटना शॉर्टसर्किटमुळे घडली असल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा... 'कोरेगाव-भीमा प्रकरणी एनआयए चौकशीचे केंद्राचे पत्र मिळाल्यानंतर पुढील पाऊल उचलणार'

ABOUT THE AUTHOR

...view details