महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ठाण्यातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी; सोशल डिस्टन्सचा फज्जा - theane crowd news

ठाण्यातील बाजारपेठेत नागरिकांनी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळली. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने राज्य सरकारने व्यापाऱ्यांना काही निर्बंध घालुन दिले होते, तसेच नागरिकांनाही आपली काळजी घेण्याची आवाहन केले असतांना ठाण्यातील बाजारपेठेत कोरोना नियमांची पायमल्ली होताना पाहायला मिळली.

Huge crowd of citizens for shopping in Thane
ठाण्यातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी; सोशल डिस्टन्सचा फज्जा

By

Published : Sep 9, 2021, 10:39 PM IST

ठाणे - आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन काही तासांवर असतांना ठाण्यातील बाजारपेठेत ठाणेकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळली. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने राज्य सरकारने व्यापाऱ्यांना काही निर्बंध घालुन दिले होते, तसेच नागरिकांनाही आपली काळजी घेण्याची आवाहन केले असतांना ठाण्यातील बाजारपेठेत कोरोना नियमांची पायमल्ली होताना पाहायला मिळली. ठाणे बाजारपेठेत विक्रेते आणि अनेक नागरिक विना मास्क वावरतांना दिसत आहेत तर दुकानदार सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवतांना दिसत आहेत. याचा आढावा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतला आहे.

ठाण्यातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी; सोशल डिस्टन्सचा फज्जा

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी -

किरकोळ सामान हे जवळपासच्या दुकानांमध्ये मिळते मात्र आता गणेशोत्सवानिमित्त पुढील 10 दिवसांसाठी आरास, मख, हरतालिका, उपवास, भाज्या, फळे आणि इलेट्रोनिक या सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी ठाणे मुख्य बाजारपेठ हा एकच पर्याय असल्यामुळे ठाण्यातील सर्व ग्राहक किरकोळ विक्रेते ही बाजार पेठेत खरेदीसाठी आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.

नागरिकांची प्रचंड गर्दी -

गणेशोत्सवाच्या आणि गौरी (महालक्ष्मी) आगमणाच्या पूर्वी मुख्य बाजारपेठेत आज नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. हरतालिकेचे उपवास आणि गणेशोत्सव आणि गौरी पूजन हे सर्व सण-उत्सव हे सोबतच आल्यामुळे नागरिकांनी पूजेच्या वस्तू आणि उपवासाचे सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

हेही वाचा -Ganeshotsav 2021 : जाणून घ्या, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details