महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात घर भाड्यावर मिळवून देणाऱ्या दलालांचा सुळसाट ठरतोय सोसायटीसमोरील चिंता - मिरा भाईंदरमधील दलाल

टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यानंतर भाडेकरूंना घर दाखवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सोसायटीमध्ये दलालांचा सुळसुळाट दिसून येत आहे. या भाडेकरू आणि दलालांना रोखायचे कसे हा प्रश्न सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

मुंबईतील इमारत
मुंबईतील इमारत

By

Published : Aug 26, 2020, 7:01 PM IST

मिरा भाईंदर (ठाणे) - कोरोना महामारीमध्ये इमारतींमध्ये भाडेकरूंना घरे दाखवण्यासाठी दलालांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोणत्याही प्रकारची सोसायटीची परवानगी न घेता भाडेकरू आणि दलाल बिनधास्त फिरत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सोसायटीमधील फ्लॅटधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विजय पाटील यांची प्रतिक्रिया
टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यानंतर भाडेकरूंना घर दाखवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सोसायटीमध्ये दलालांचा सुळसुळाट दिसून येत आहे. या भाडेकरू आणि दलालांना रोखायचे कसे हा प्रश्न सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. टाळेबंदीमध्ये अनेक व्यवहार ठप्प झाले होते, त्यामुळे भाडेतत्वावर राहणाऱ्या अनेकांच्या खोलीचा करारनामा संपुष्टात आला आहे, या नागरिकांना इतरत्रही स्थलांतर करण्यासाठी खोलीच्या शोधात वणवण फिरत आहेत. परंतु ज्या सोसायटीमध्ये कोरोना रुग्ण जास्त असल्यामुळे प्रशासनाकडून कंटेंटमेंट झोन घोषीत केले आहे. मात्र भाडेकरूंना कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने, हे दलाल कंटेंटमेंट झोन मधील इमारतीत मोकाट फिरत आहेत.

हेही वाचा -'मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला संसार शोधायला सुरूवात'

दलाल प्रतिबंधीत क्षेत्रातून आले आहेत की नाही हे कसे समजणार? त्यामुळे सोसायटीमधील अध्यक्ष सचिव, सदस्य यांना प्रश्नः पडला आहे. टाळेबंदीमुळे परराज्यातील अनेक कुटुंब घर खाली करून गेल्याने ते भाडेतत्वावर लावण्यासाठी घरमालक दलालांना थेट संपर्क करत आहेत. घरमालकाची परवानगी असल्यामुळे हे मुजोर दलाल सोसायटीमधील कमिटीला न विचारता घर दाखवण्यासाठी भाडेकरूंना घेऊन जात आहेत. दलालांचे जाळे मोठे असल्याने एकमेकांना संपर्क साधून एक खोली दाखवण्यासाठी दिवसभरात तीन ते चार दलाल भाडेकरूंना घेऊन येतात. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांना कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वाटते आहे.

हेही वाचा -कोविड लसीचा भारती विद्यापीठात करण्यात आला प्रयोग - राज्यमंत्री विश्वजित कदम

ABOUT THE AUTHOR

...view details