महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मीरारोडच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सन्मान - Mira Road police news

सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांना मुंबईत क्लासिक कार कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट महिला कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Tejashree Shinde
Tejashree Shinde

By

Published : Dec 15, 2020, 1:49 PM IST

मीरा भाईंदर - मीरारोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांना मुंबईत क्लासिक कार कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट महिला कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

कोण आहेत तेजश्री शिंदे?

मूळच्या पुणे जिल्ह्यातील आहेत. तेजश्री शिंदे यांनी आपले शैक्षणिक शिक्षण मुंबईतून पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस दलात २०१३ मध्ये १०८च्या बॅचमध्ये उपनिरीक्षकपदाचे प्रशिक्षण पूर्ण केले. सेकंड परेड कमांडर म्हणून यशस्वीरित्या ट्रेनिंग पूर्ण करून मुंबई पोलीसदलात पोलीस उपनिरीक्षकपदी रुजू झाल्या. त्यानंतर एकूण चार पुरस्कार प्राप्त केले. मुंबई पोलीस दलामध्ये आजवर अनेक चांगली कामगिरी पार पाडून अनेक गुन्ह्यांची उकल करून माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांच्या हस्ते अनेक सन्मानपत्र प्राप्त केलेली आहेत. पोक्सो कायद्याअंतर्गत बाल कल्याण अधिकारी म्हणून मुंबईमध्ये सलग तीन वर्ष काम करून पाच हजाराहून अधिक बालकांना बालकांचे अधिकार, गुड टच बॅड टच, बालकांना कायद्याचे प्रशिक्षण दिलेले आहे.

अनेक गुन्ह्यांची शास्त्रशुद्ध उकल

मीरा रोड पोलीस ठाणे येथे डबल मर्डर केस, दरोडा पूर्वतयारी, बेटिंग, पिटा इत्यादी अनेक गुन्ह्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने उकल करून वरिष्ठांची शाबासकी मिळवली आहे. कोविडच्या काळात ऑनलाइन फ्रॉड थांबविणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे, कायदा-सुव्यवस्था सोबतच सामाजिक भान जागृत ठेवून नागरिकांना मदत केल्याबाबत covid-19च्या काळातली सर्वोत्कृष्ट महिला योद्धा म्हणून क्लासिक कार रॅली 2020 आयोजित कार्यक्रमांमध्ये गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच Mercedes Benz या कंपनीतर्फे Vintage Car Rallyमध्ये सहभागी करून घेण्यात

ABOUT THE AUTHOR

...view details