ठाणे -कर्नाटकात मुस्लीम विद्यार्थिनींनी हिजाब घातला म्हणून त्यांना कॉलेजप्रवेश नाकारण्यात आला. श्रीराम सेनेने हिजाब विरोधात आंदोलन पुकारले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मुंब्रा रेतीबंदर येथे सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो हिंदू - मुस्लीम महिला रस्त्यावर उतरल्या. यावेळी मुस्लीम महिलांनी जय श्रीरामसह अल्लाह हू अकबरचे नारे देत भारतातील सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडविले.
हेही वाचा -Cluster Development Project : ठाणेकरांना हक्काचे घर देणार -एकनाथ शिंदे
कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथे सरकारी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिजाब घालून प्रवेश करणार्या विद्यार्थिनींना बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने जारी केलेल्या ड्रेसकोडच्या नियमांना अनुसरून हिजाब घालणार्या विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार नाही, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तसेच, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा - मुंब्रा येथील शेकडो हिंदू - मुस्लीम महिलांनी निदर्शने केली. यावेळी महिलांनी ‘हिजाब हमारा अलंकार है; कर्नाटक सरकार होश मे आवो; जय श्री राम, अल्लाह हू अकबर; श्रीराम के नाम पर, मत बाँटो इन्सान को, अशा घोषणा दिल्या.