ठाणे -गेल्या पाच दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती ( Flood like situation in Thane ) निर्माण झाली असून सर्वच नद्यांना पूर आला आहे. याचा सर्वाधिक फटका कल्याण - नगर या राष्ट्रीय क्रमांक २२२ महामार्गाला बसला आहे. माळशेज घाट माथ्यावर जोरदार पाऊस ( Heavy rain at Malshej Ghat ) होत असल्याने कल्याण - नगर मार्गावरील मुरबाड तालुक्यातील किशोर गावातून जाणाऱ्या मार्गावर पुराच्या पाण्याचे लोंढे वाहत आहेत. शिवाय ठिकठिकाणी मार्गावर पाणी साचले आहे. त्यामुळे सकाळपासून कल्याण – नगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद ( Kalyan-Nagar National Highway closed )आहे.
वाहनांना मुरबाड येथे थांबवले - पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे नगरहून येणाऱ्या वाहनांना मुरबाड येथे थांबवावे ( Vehicles stopped at Murbad )लागले . तर याच मार्गे दूध व भाजी वाशी मार्केटला जाते. मार्गावर पाणी असल्यामुळे ही वाहने मुरबाड येथे अडकून पडली आहेत. यामुळे दूध, भाजीपाला मार्केटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुराच्या पाण्याचा लोंढा मार्गावरून जोरात वाहत आहे. यामुळे दोन्ही बाजूने हजारो वाहनांसह शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. दुसरीकडे मुरबाड तहसील प्रशासन आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोली निरीक्षक बालाजी पांढरे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर उपाययोजना करीत आहेत.
नंदुरबारमध्ये शाळांना सुट्टी -हवामान खात्याने दिलेल्या इशारा नंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर नवापूर तालुक्यातील शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन, नदी काठावर असलेले गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर शहरातील रंगावली काठावरील 100 घरातील 400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.