ठाणे - शहरात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नितीन कंपनी उड्डाणपूलावरील खांबावर वीज कोसळली असून, ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. पाचपाखाडी येेथे नितीन कंपनीजवळ पूर्व द्रूतगती मार्गावरील पथदिव्यांच्या खांबावर वीज कोसळली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
ठाण्यात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात; उड्डाणपूलावर कोसळली वीज
पाचपाखाडी येथे नितीन कंपनीजवळ पूर्व द्रूतगती मार्गावर पथदिव्यांच्या खांबावर वीज कोसळली. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
शहरात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली
अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे कामावरून परतणाऱयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. तासाभरात जवळपास 32 मिलिमीटर पाऊस पडल्याने ट्रान्स हार्बर वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. ठाण्यातून पनवेल व वाशी मार्गावरील वाहतूक आर्धा तास उशिराने सुरू होती.
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.