ठाणे -एकमेकांकडे बघण्याच्या खुन्नशीतून दोन तरुणांनी एका तरुणावर हल्ला करत त्याच्यावर चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेकडील पुना लिंक रोडवरील विनायक कॉलनी गेटजवळील पान टपरीवर घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात २ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. तर जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशिष दास (वय, ३० ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर सय्यद आणि रव्या अशी हल्लेखोर तरुणांची नावे आहेत.
खुन्नशीतून पाहण्यावरून वाद.. तरुणावर चाकूने वार, हल्लेखोर फरार - Thane crime news
एकमेकांकडे बघण्याच्या खुन्नशीतून दोन तरुणांनी एका तरुणावर चाकूने वार केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. या दोन तरुणांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात असलेल्या नारायण बंगाली इमारतीमध्ये आशिष दास हा कुटूंबासह राहतो. तो रविवारी रात्री दहाच्या सुमारास तिसगाव येथिल पुना लिंक रोडला असलेल्या विनायक कॉलनी गेटजवळील पान टपरीवर आला आणि मित्र सोहेल खान यांच्यासोबत पान खाण्यासाठी थांबला होता. यावेळी त्या ठिकाणी आरोपी सय्यद व रव्या आपल्या दोन साथीदारांसह उभे होते. रव्या याने आशिष याला माझ्याकडे का बघतोस? असे विचार शिवीगाळे कली . त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुकी झाली. याच दरम्यान आरोपी सय्यद व त्याच्या साथीदारांनीही लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. आरोपी रव्याने त्याच्याजवळील धारदार चाकूने अशिष याच्या पृष्ठभागावर वार केल.
या चाकू हल्ल्यात आशिष याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर कोळसेवाडी पोलिस ठाण्यात फरार हल्लेखोर सय्यद आणि रव्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस नाईक बाळकृष्ण शेडगे करत आहेत.