महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गर्लफ्रेंडसाठी काय पण.! इम्प्रेशन मारण्यासाठी 'तो' लंपास करायचा महागड्या दुचाकी - Thane crime news

गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग पत्करला होता. त्याने विविध महागड्या २८ दुचाकी चोरी केल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

he-stole-28-bikes-to-make-an-impression-on-his-girlfriend
गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी 'तो' लंपास करायचा महागड्या दुचाकी; २८ दुचाक्या हस्तगत

By

Published : Mar 16, 2020, 6:31 PM IST

ठाणे -गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करून चोरट्याने साथीदारांच्या मदतीने तब्बल २८ महागड्या दुचाक्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरट्याला साथीदारासह कोनगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या विषयी माहिती भिवंडी झोनचे पोलीस उपआयक्त राजकुमार शिंदे यानी दिली आहे.

गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी 'तो' लंपास करायचा महागड्या दुचाक्या; २८ दुचाकी हस्तगत

विशेष म्हणजे या चोरट्याने भिवंडी, पुणे, कर्नाटक राज्यातून ८ रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बुलेट लंपास केल्या होत्या. तर अन्य २० दुचाक्या विविध कंपनीच्या असून मौज-मजा करण्यासाठी तो लंपास केलेल्या दुचाकी ३ ते १० हजार रुपयांत विक्री करत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. मसू उर्फ पिंटू राम मोरे (वय, २४ रा. रांजणोनी, भिवंडी ) हा मूळचा सोलापूर जिल्ह्याचा रहिवाशी आहे, तर प्रदीप हनुमंत क्षेत्री (वय १९, रा. पिंपळघर,भिवंडी ) असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दुचाकी चोरी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदशनाखाली एपीआय अभिजित पाटील, सह पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलीस नाईक किरण पाटील, गिरीष पवार, संतोष पवार, पोलीस शीपाई भागवत दफीफळे, नरेंद्र पाटील, कृष्ण महाले, अविनाश पाटील या पोलीस पथकाला गुप्त माहितीदरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक मदतीने मुंबई-नाशिक मार्गावरील सरवली येथील बासुरी हॉटेल समोर चोरटा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी सापळा लावून मसू उर्फ पिंटू याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता. त्याने मैज मजा आणि गर्लफ्रेंडला विविध दुचाक्यांवर फेरफटका मारून तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने २८ दुचाक्या चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

चोरट्याने काही दुचाक्या कर्नाटक, सोलापूर मधील आपल्या नातेवाईकांना ३ ते १० हजार रुपये किंमतीत काही दुचाक्या विक्री केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. कोनगाव पोलिसांनी या दुकलीकडून आतापर्यत २८ दुचाक्या हस्तगत केल्या असून त्यामधील ११ दुचाक्या बेवारस आहे. या चोरट्याच्या आणखी २ साथीदारांची नावे पोलीस तपासात समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती भिवंडी झोनचे पोलीस उपयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details