नवी मुंबई - नवी मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून तब्बल 35 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच एक टेम्पो, एक पिकअप व एक इको व्हॅन असा सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून 35 लाखांचा गुटखा जप्त; चौैघांना अटक - crime branch news
हॉटेल सिल्वर की येथून गुटखा वाहतूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत नवी मुंबई पोलिसांनी विमल कंपनीचा पान मसाला व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे.
महापे एमआयडीसी येथील हॉटेल सिल्वर की येथून गुटखा वाहतूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत नवी मुंबई पोलिसांनी विमल कंपनीचा पान मसाला व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे. हा गुटखा हा राज्यात प्रतिबंधित असून गुजरात येथून आणण्यात आला होता. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून यात आणखी अनेक मोठे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.