महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भिवंडीत ३२ किलो गांजासह ४२ लाखांचा गुटखा जप्त; आठहून अधिक गुन्हेगारांना अटक - Gutka Cannabis seized Bhinwadi city etvbharat

एकीकडे एनसीबीचे प्रकरण गाजत असतानाच भिवंडी शहरातील तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील पोलीस पथकाने ३२ किलो गांजा, नशेसाठी वारपण्यात येणाऱ्या शेकडो औषधांच्या बाटल्यांसह तब्बल ४२ लाखांचा गुटखा ट्रकसह जप्त केला आहे. पोलिसांनी तिन्ही गुन्ह्यातील आठहून अधिक आरोपींना अटक केली आहे.

Gutka Cannabis seized Bhinwadi city etvbharat
भिवंडी गांजा जप्त

By

Published : Oct 28, 2021, 4:48 PM IST

ठाणे - एकीकडे एनसीबीचे प्रकरण गाजत असतानाच भिवंडी शहरातील तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील पोलीस पथकाने ३२ किलो गांजा, नशेसाठी वारपण्यात येणाऱ्या शेकडो औषधांच्या बाटल्यांसह तब्बल ४२ लाखांचा गुटखा ट्रकसह जप्त केला आहे. पोलिसांनी तिन्ही गुन्ह्यातील आठहून अधिक आरोपींना अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा -2 मिनिटांत 2 लाखांचे दागिने लांबविणाऱ्या बुरखाधारी महिला सीसीटीव्हीत कैद

नाकाबंदी केल्याने गांजाचे घबाड उघड

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ विक्री केले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस येत आहे. आजही मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने भिवंडी शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी अमलीपदार्थ विक्रीसह वाहतूक करणाऱ्या माफियांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा वाहतूक होत असल्याची खबर पोलिसांना लागताच मंगळवारी रात्रीच्या सुमारास भोईवाडा पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून धामणकर नाका, भंडारी कम्पाउंड, कारीवली रोड येथे नाकाबंदी लावून संशयित वाहनांची तपासणी केली. त्यावेळी धामणकर नाका येथे एक महिंद्रा पिकअप टेम्पो भरधाव वेगाने येत असल्याचे दिसल्याने हा टेम्पो अडवून टेम्पोची झडती घेतली असता त्याच्या कॅबीनच्या टपावर बनविण्यात आलेल्या कॅरीअर बॉक्समध्ये १५ पॅकेटमध्ये ३२ किलो ५३७ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. टेम्पोसह 4 लाख 18 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भोईवाडा पोलिसांनी जप्त करून रहीम करीम शेख (वय २९ वर्षे, रा. खाडीपार) व सलीम फकीर मोहम्मद अन्सारी (वय ४५ वर्षे रा. खाडीपार) असे गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक केली.

गुजरात राज्यातून आणलेला ४२ लाखांचा गुटखा जप्त

भिवंडीत आजपावेतो कारवाई करून कोट्यवधींचा गुटखा व तंबाखूजन्य पानमसाला जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. असे असताना गुजरात राज्यातून प्रतिबंधित गुटखा पान मसाला भिवंडीच्या गोदामात साठा करून त्याची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर नादिनाका येथे काल रात्रभर पाळत ठेवण्यात आली. त्यावेळी संशयित आयशर ट्रक व त्या पाठोपाठ स्विफ्ट कार येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, या दोन्ही गाड्यांना थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये अवैध, प्रतिबंधित गुटखा पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत ४२ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा सुगंधित मसाला व तंबाखूजन्य गुटखा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालक सुदाम मेहबूब शेख(वय २९) जिशान अहमद अबुजैद शेख (वय २५) मोहम्मद इब्राहीम हकीमुद्दीन शेख (वय २८) गुलजार शेख, मनिष भानुशाली अशा पाच जणांविरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नशेसाठी वापरणाऱ्या कफसिरपच्या सहाशेहून अधिक बाटल्या हस्तगत

भिवंडी शहरात कफसिरप व गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात सर्रास वापर होत असून या नशेच्या आहारी गेलेल्या युवकांकडून चोऱ्या घरफोडीच्या घटना घडत असल्याने शहरात गुन्हेगारांचे प्रमाण वाढले. त्यातच शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांना गुप्त बातमीदाराकडून कफसिरप औषधीच्या बाटल्या विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. पो.उप.नि रवींद्र पाटील यांच्या पथकाने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी सापळा रचून ४ आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून दोन लाखांहून अधिक किंमतीच्या (Phencyrex) या कफ सिरपच्या ६०० हून अधिक औषधींच्या बाटल्या जप्त केल्या, अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा -उल्हासनगरात भाजपाला खिंडार! 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details