महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dwarka Drug Case : गुजरात पोलिसांनी मुंब्रा येथून आरोपीला केली अटक - mumbra police station

गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात पोलिसांनी तब्बल ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ बुधवारी जप्त केले. यापैकी ८८ लाखांचे १९ पॅकेट हे प्रथम सकाळीच जप्त करण्यात आले. त्यानंतर अन्य ४७ पॅकेट पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी मुंब्रा येथून एकाला अटक केली आहे.

file photo
फाईल फोटो

By

Published : Nov 11, 2021, 8:44 PM IST

ठाणे - गुजरात राज्यात सापडलेल्या अमली पदार्थाच्या(Gujarat drug case) साठ्याचे थेट कनेक्शन मुंब्रा असल्याचे समोर आले आहे. गुजरात पोलिसांच्या(Gujarat Police) पथकाने मुंब्रा परिसरातून सिद्दीकी कॉम्प्लेक्स येथून साजिद दोषी या आरोपीला अटक केली आहे.

सदर आरोपी हा हत्येची शिक्षा भोगत असून, तो कोरोनाच्या काळात पेरॉलवर आलेला असल्याचे समोर आले आहे. त्याचा सहभाग गुजरातमध्ये सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणात असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट करून त्याला अटक केली. याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्याचे(Mumbra Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा -gujarat drug case : गुजरातमध्ये 350 कोटींचे ड्रग्ज जप्त, पाकिस्तानातून समुद्रीमार्गे गुजरातमध्ये

गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात पोलिसांनी तब्बल ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ बुधवारी जप्त केले. यापैकी ८८ लाखांचे १९ पॅकेट हे प्रथम सकाळीच जप्त करण्यात आले. त्यानंतर अन्य ४७ पॅकेट पोलिसांनी जप्त केले. सदरचा अमली पदार्थांचा साठा हा पाकिस्तानमधून सागरी मार्गाने तस्करी करत गुजरात द्वारका पोर्टवर आणण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदर प्रकरणाचा तपास केल्यानंतर मात्र गुजरात पोलिसांना या तस्करी प्रकरणी साजिद दोषी याचा सुगावा लागला. आरोपी साजिद दोषी हा मुंब्रा परिसरातील राहणार असल्याच्या माहितीवरून गुजरात पोलिसांनी त्याला मुंब्रा परिसरातून अटक केली. गुजरात पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थामध्ये ६ किलो ६०० ग्राम मेथॅम्फेटामाइन तर ११ किलो ४०० ग्रामची हिरोईन सापडली.

  • मुंब्य्रातील भाजी विक्रेता निघाला गुजरातचा ड्रग्ज तस्कर -

गुजरात पोलिसांच्या ताब्यातील आरोपी साजिद दोषी हा मुंब्रा परिसरातील जुना रहिवाशी असून, तो मुंब्रा परिसरात भाजी विकण्याचा धंदा करीत होता. साजिद दोषी हा सन २००९ या वर्षात मुंब्रा परिसरातील श्रीलंका परिसरात राहत होता. त्याने पुंडलिक म्हात्रे नावाच्या व्यक्तीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून ते प्लास्टिक पिशवीतून फेकण्यासाठी गेला. दरम्यान, तात्कालीन मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सोंडे यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या अधारे पोलिसांनी मृतदेहाच्या तुकड्यासह त्याला अटक केली. त्यानंतर आता साजिद दोषी हा अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला मुंब्रा येथील घरातून अटक केली.

  • मुंब्रा पोलिसांनी केली त्याच्या कुटुंबीयांची चौकशी -

गुजरात पोलिसांनी साजिद दोषी याला अटक केली. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी सिद्दीकी कॉम्प्लेक्समध्ये राहणारे त्याची पत्नी आणि मुलांची चौकशी पोलीस ठाण्यात आणून केली. मात्र, चौकशीत त्यांनी काय माहिती दिली हे अद्याप समजू शकले नाही.

  • आरोपी हत्या प्रकरणात शिक्षा भोगणारा आणि पेरोलवर सुटलेला -

सन २००९ साली मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये पुंडलिक म्हात्रे नावाच्या व्यक्तीच्या खुनाचा प्रमुख आरोपी साजिद दोषी आहे. साजिद दोषी याने उधार घेतलेले ५० हजार रुपये देण्यासाठी म्हात्रे यांना घरी बोलावले होते. त्यानंतर त्यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून तीन दिवस ते सांभाळत होता. याबाबतची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाल्यानंतर तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोंडे यांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने दोषी ठरवीत १४ वर्षाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्याची पेरॉलवर सुटका करण्यात आली.

  • साहेब...मी भाजी विक्रेता आहे -

३०० कोटींच्या अमली पदार्थ जप्त प्रकरणी गुजरात पोलिसांच्या अटकेतील आरोपी साजिद दोषी याच्या चौकशीत सदरचे अमली पदार्थ हे सलीम याकूब कारा आणि अली याकूब कारा (रा. जामनगर) यांनी दिल्याचा उलगडा झाला. गुजरात राज्यातील द्वारका येथील पोलिसांना सदर अमली पदार्थ प्रकरणात मुंब्रा येथील रहिवाशी साजिद दोषी असल्याचे समोर आले, तेव्हा द्वारका पोलीस मुंब्र्यात पोहचले. त्यांनी साजिदला घरातून अटक केल्यानंतर साजिद दोषी म्हणाला "साहब ...मैं भाजी बेचता हू". मात्र, त्याचा पूर्व गुन्हेगारीचा इतिहास तपासल्यानंतर हा हत्येत शिक्षा भोगणारा आणि पेरोलवर सुटलेला गुन्हेगार असल्याचे समोर आले.

हेही वाचा -Gujarat Drug Case : दीड ग्रॅम ड्रग्ज पकडणाऱ्याने द्वारकेतल्या 350 किलो ड्रग्जचा तपास करावा - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details