महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गुजरातच्या मॉडेल तरुणावर ठाण्यात सामुहिक बलात्कार, तिघे ताब्यात - ठाण्यात सामुहिक बलात्कार

या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पीडित तरुणाच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच वागळे इस्टेट पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

Gujarat model gang-raped in Thane
गुजरातच्या मॉडेल तरुणावर ठाण्यात सामुहिक बलात्कार, तिघे ताब्यात

By

Published : Jan 7, 2021, 11:38 PM IST

ठाणे - फेसबुकवर मैत्री झालेल्या ठाण्यातील मित्रांनी गुजरात राज्यात मॉडेल असलेल्या एका १९ वर्षीय तरुणावर अनैसर्गिक सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निर्जन असलेल्या एका कंपनीच्या गच्चीवर हा बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पीडित तरुणाच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच वागळे इस्टेट पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर संशयितांना ताब्यात घेतले आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा - कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात आणखी तीन रुग्ण; रुग्णांचा आकडा 11 वर

फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर पीडित व्यक्ती नातेवाईकाकडे ठाण्यात आला होता. पुनीत शुक्ला (२६)या आरोपीने सदर तरुणाला रविवारी रात्री साठे नगर परिसरात अनेक वर्ष बंद पडलेल्या कंपनीजवळ बोलावले. पुनीतचे मित्रही तिथे आले. त्यांनी संबंधित तरुणाला बांबुने मारहाण केली. अन त्याच्यावर चौकडीपैकी तिघांनी बलात्कार केला. यानंतर त्यांनी पीडित तरुणाकडे असलेली ६ हजाराची रोकड आणि मोबाइलफोन लुटून नेला. शिवाय, या घटनेची कुठे वाच्यता केली तर काढलेले चित्रण फेसबुकवर टाकू, अशी धमकीही त्यांनी या तरुणाला दिली. मात्र, तरुणाने हिंमत दाखवत सोमवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्वरित सूत्र हलवत आरोपी पुनीत शुक्लाला अटक केली. शिवाय, अन्य दोघा संशयितांना ताब्यात घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details