ठाणे - व्यसन सोडवण्यासाठी लोक डॉक्टरांकडे जातात, परंतु आता डॉक्टरांना व्यसन सोडवण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागत आहे. एकीकडे करोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात मानसिक ताण आहे. तर दुसरीकडे जे डॉक्टर या काळात प्रक्टिस करत नाहीत, त्यांचेही मानसिक खच्चीकरण झाल्याने ते तणावाखाली आहेत. अशा डॉक्टरांमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत आहे, अशी धक्कादायक माहिती आय. पी. एच. अर्थात इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थचे विश्वस्त, मनोविकार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी दिली आहे.
'मानसिकरित्या सर्व डॉक्टरांचे खच्चीकरण होत आहे'
गेल्या दीडवर्षाच्या कोरोना काळात एकीकडे अनेकांची नोकरी गेली तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे सर्वसामान्य माणूस मानसिकरित्या कोलमडला आहे. हीच अवस्था आता रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचीही झाली आहे. खासकरून जे डॉक्टर कोरोनाच्या रुग्णावर उपचार करत आहेत, त्यांचे काम तर प्रचंड वाढले आहे, त्यात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसोबत सतत होणाऱ्या वादामुळे मानसिकरित्या या सर्व डॉक्टरांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे डॉक्टरांवर मानसिक ताण वाढला आहे. तसेच कोविडच्या सेवेत नसणाऱ्या, इतर प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रॅक्टिसवरही या काळात परिणाम झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्जरी होत नाही. बालरोगतज्ञांचीही प्रॅक्टिस ३० ते ४० टक्क्यांवर आली आहे. जे डॉक्टर १५ ते २० वर्षांपासुन फक्त प्रॅक्टिस करत आहेत, अशा डॉक्टरांची प्रॅक्टिस कमी झाल्यामुळे त्यांच्यातील व्यसनाधीनता ही वाढीला लागली आहे. असे आय. पी. एच. अर्थात इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थचे विश्वस्त, मनोविकास तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे बोलले आहेत.
प्रशासन आणि राजकारणी यांच्याकडून येणार ताण
वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांवर दोन प्रकारचे ताण आहे. याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. नाडकर्णी म्हणाले की, प्रत्यक्ष कोविड सेवेत असणाऱ्यांचे ताण वेगळे आहेत. त्यांना दररोज मृत्यूचे तांडव पाहायला लागते, दररोज कितीतरी मृत्यू प्रमाणपत्र बनवावे लागते, नातेवाईकांना पटवून द्यावे लागते, या हॉस्पिटलमध्ये जागा नाही, दुसरीकडे जा, हे सांगण्यासाठी तासनतास समजूत घालावी लागते. हा सर्व आघात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. प्रत्यक्ष कोविड सेवेत असणाऱ्यांना बेड, इंजेक्शन, ऑक्सिजन यांच्या तुटवडा व प्रशासन आणि राजकारणी यांच्याकडून येणार ताण सहन करावा लागतो.
'कोविडचा व कोविड काळाचा असे दोन पैलू'