महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gram Panchayat Election: ग्रामपंचायत धुमशान; भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाची सरशी - 158 Gram Panchayat Elections Announced

Gram Panchayat Election: ग्रामपंचात निवडणुकाचा प्रचार शिगेला पोचवला असतानाच भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मुरबाड तालुकातील ३५ ग्रामपंचात निवडणुकीत शिंदे गटाची सरशी झाल्याचे बिनविरोध निवडणून आलेल्या सरपंच व सदस्यांच्या संख्येवरून दिसून आले आहे. Gram Panchayat Election विशेष म्हणजे आमदारपद, नगरपंचायत समिती सभापतीसह अर्ध्याहून अधिक ग्रामपंचायती भाजपाच्या कब्जात Gram Panchayat under BJP control आहेत.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election

By

Published : Oct 12, 2022, 6:57 PM IST

ठाणे: ग्रामपंचात निवडणुकाचा प्रचार शिगेला पोचवला असतानाच भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मुरबाड तालुकातील ३५ ग्रामपंचात निवडणुकीत शिंदे गटाची सरशी झाल्याचे बिनविरोध निवडणून आलेल्या सरपंच व सदस्यांच्या संख्येवरून दिसून आले आहे. Gram Panchayat Election विशेष म्हणजे आमदारपद, नगरपंचायत समिती सभापतीसह अर्ध्याहून अधिक ग्रामपंचायती भाजपाच्या कब्जात Gram Panchayat under BJP control आहेत. त्यातच राज्यातील सत्ता संघर्षानंतर मुख्यमंत्र्याच्या जिल्हात १५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर 158 Gram Panchayat Elections Announced होताच मुरबाड तालुक्यात शिंदे गट सक्रिय होऊन भाजपाच्या बालेकिल्ल्यात दोन ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंचपदी निवडून येत शिंदे गटाला झेंडा फडकविण्यात यश मिळवले आहे.

१० सरपंचासह १२५ सदस्यही बिनविरोध मुरबाड तालुक्यात ३५ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यापैकी 10 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरित २६ ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल ३०० उमेदवार ग्रामपंचायत सदस्यासाठी तर ६५ उमेदवार थेट सरपंच पदासाठी निवडून लढत आहेत. तर १० सरपंचाची बिनविरोध निवड झाली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे ग्रामपंचायत खेवारे- इंद्राबाई रामचंद्र नाडेकर, उमरोली- देवकी सुनील पवार, नांदगाव- जया गणपत वाघ, दहिगाव चाफे- मनीषा किसन सोनिया, किसळ- कविता नामदेव वारे, शेळगाव- मिनाबाई हैबत हिलम, इंदे- कान्हा वसंत वाघ, वेळूक- चित्रा मुकुंद हिलम, साखरे- अंकिता मयूर वाघ, पवाळे- दीपक मारुती घरत असे 10 ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.

या ग्रामपंचायतीत निवडणुका नाहीत मुरबाड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अर्ज दाखल झाला नसल्याने सरपंच पदे रिक्त राहणार आहेत. वडवली व उमरोली खुर्द या ग्रामपंचायत सदस्य पदासाठीही अर्ज दाखल झाला नाही. तर आंबेळे (खु) ग्रामपंचायत सदस्य पदासाठी फक्त एक अर्ज दाखल झाला आहे. उर्वरित 6 जागा रिक्त राहणार असल्याने या ठिकाणी निवडणुका होणार नाहीत तसेच वेळूक खेवारे, पवाळे, साखरे, नांदगाव, दहिगाव- चापे या 6 ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य सुद्धा बिनविरोध निवडून आल्याने या ठिकाणी निवडणूक होणार नसल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून मिळाली आहे.

पाचही राजकीय पक्षांची निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापणा तालुक्यातील १२५ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उर्वरित राहिलेल्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास ३०० सदस्य पदासाठी तसेच सरपंच पदासाठी ६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच शिंदे गट या प्रमुख पक्षाने या निवडणुकीमध्ये आपापली प्रतिष्ठापणा लावून निवडणुकीला चांगलीच रंगत आणण्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे मिनी जिल्हा परिषद व पंचायत समिती समजली जात आहे. पेसा अंतर्गत भागात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसून येत आहे. २६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७६ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी मुरबाड तहसील कार्यालयामार्फत निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा नायब तहसिलदार प्रसाद पाटील यांनी दिली आहे.

2 ग्रुप ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यातील बांधिवली व घागुरली या ग्रुप ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली. या ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. एकंदरीतच मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांच्या गटाचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. मुरबाड तालुक्यात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व असल्याने भाजपचे स्थानिक कार्यकर्तेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजपाला शिंदे गटानेच आव्हान उभे केल्याचे मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचात निवडणुकीवरून दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details