महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thane Swami Vivekanand Drama : ठाण्यात स्वामी विवेकानंदांवर आधारित नाट्याचे आयोजन, राज्यपालांचीही हजेरी - ठाणे स्वामी विवेकानंद नाटक

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ( Thane Kashinath Ghanekar Theater ) या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित ( Swami Vivekanand Drama ) भाव नाट्य कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. यासाठी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat Sign Koshyari ) देखील उपस्थित होते.

Thane Kashinath Ghanekar Theater
Thane Kashinath Ghanekar Theater

By

Published : Mar 4, 2022, 9:50 PM IST

ठाणे -ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ( Thane Kashinath Ghanekar Theater ) या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित ( Swami Vivekanand Drama ) भाव नाट्य कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. यासाठी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat Sign Koshyari ) देखील उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रिपोर्ट

अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त -

औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवप्रेमी व महाविकास आघाडी यांनी निषेध केलेला आहे, तर आज सकाळी सोलापूर दौऱ्या दरम्यानदेखील राज्यपालांचा दौरा अडवण्याचा काम सोलापूर येथे महाविकास आघाडीकडून करण्यात आले होते. त्यावेळी देखील त्यांनी निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात -

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरोधात आंदोलने होणार, हे लक्षात घेऊन कालपासून पोलिसांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना नोटीसा बजावल्या होत्या, तर आगमनाच्या आधी अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यात ठाणे नगर पोलीस ठाणे वागळे इस्टेट पोलीस ठाणे आणि नौपाडा पोलीस ठाण्याचा हद्दीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा -Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्शच्या निधनाचे सकाळी केले होते ट्विट; संध्याकाळी शेन वॉर्नचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details