महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ओबीसींचा हक्क हिसकवण्याचा सरकारचा डाव, वंचित आघाडीचे सुनील भगत यांची टीका - ओबीसी राजकीय आरक्षण

राज्यातील ५ जिल्ह्यामध्ये पोट निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने या पाच जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातील जागा रद्द केल्यामुळे ५ जिल्ह्यात ओबीसींच्या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. दरम्यान, ओबीसींची दिशाभूल करण्याचे षडयंत्र सुरू आहे अशी टीका वचिंत बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषद
पत्रकार परिषद

By

Published : Sep 21, 2021, 7:20 AM IST

ठाणे - राज्यातील ५ जिल्ह्यामध्ये पोट निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने या पाच जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातील जागा रद्द केल्यामुळे ५ जिल्ह्यात ओबीसींच्या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. असे असताना महाराष्ट्र सरकारने जो अध्यादेश काढला आहे तो म्हणजे ओबीसींची दिशाभूल करण्याचे षडयंत्र आल्याचे मत, ठाणे जिल्हा वचिंत बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत व्यक्त केले आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगून राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे.

पत्रकार परिषद

ओबीसीची मते मिळवण्यासाठी चाललेले नाटक

आम्ही ५० % च्या अधीन राहून ओबीसींच्या आरक्षणाचा अध्यादेश काढू असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले. मात्र, अध्यादेश काढणे म्हणजे ओबीसीची मते मिळवण्यासाठी चाललेले नाटक आहे. ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाची सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपा या पक्षांनी वाट लावली. त्याचप्रमाणे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची वाट लावण्याचे राजकारण सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपा खेळत आहेत. या फसवणुकीच्या षडयंत्रापासून ओबीसींनी सावध राहावे, असही ते म्हणाले आहेत.

टोल वसुली जोमात रस्ते गेले कोमात

ठाणे-भिवंडी-वडपा रस्त्यावर एम. एम. आर डि.ए. मार्फत मेट्रोचे काम चालू आहे. सदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असूनही टोलवसुली केली जाते. त्यामुळे टोल वसुली बंद करण्यात यावी. तसेच ठाणे-भिवंडी या मार्गाची एमएमआरडीएकडून देखभाल दुरुस्ती केली जाते. तर भिवंडी-ठाणे या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देखभाल दुरुस्ती केली जाते. मात्र, दोन्ही मार्गावर टोल वसुली जोरात सुरु असून, रस्ते मात्र कोमात गेल्याची टीका वंचितचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत यांनी केली आहे. तर, दोन्ही रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ २४ सप्टेंबर रोजी कशेळी टोल नाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details