महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक! मोबाइलवर गेम खेळणाऱ्या मुलीला आई रागावल्याने मुलीची आत्महत्या - ठाणे पोलीस बातमी

ही घटना भिवंडी शहरातील न्यू टावरे कंपाऊंड परिसरातील एका घरात घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ठाणे
ठाणे

By

Published : Apr 20, 2021, 3:04 PM IST

ठाणे -15 वर्षीय अल्पवयीन मुलगी टीव्ही पाहत असताना मोबाइलवर गेम खेळत होती. त्यावेळी आईने टीव्ही पाहत असताना मोबाइलवर गेम खेळू नको असे दरडावले. त्यामुळे आई आपल्यावर रागावल्याने या मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील न्यू टावरे कंपाऊंड परिसरातील एका घरात घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कोमल रवींद्र सलादल्लू (वय, 15 ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे घरातच राहू कुटुंब टीव्ही किंवा मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. अशीच मृत कोमल ही रविवारी घरांमध्ये टीव्ही पाहत होती. त्याच वेळी ती मोबाइलवर गेम खेळत असताना तिची आई तिच्यावर रागवली होती. याच गोष्टीचा राग येऊन तिने पहिल्या मजल्यावरील घरात जाऊन सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत कोमलचा मृतदेह भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, मृत मुलीच्या आईने कोणतीही तक्रार दिली नसल्याने भोईवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-

ABOUT THE AUTHOR

...view details