महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीत गॅस गळती; परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा त्रास

अंबरनाथ शहरातील नेहरू उद्याना समोरील केमिकल कंपन्यांनी उग्र वास असलेला गॅस सोडल्याने स्वामीनगर, कानसई , साई सेक्शन, भीमनगर, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. उग्र वास असलेल्या गॅसने नागरिकांना खोकल्याचा आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. एवढेच नव्हे तर गॅस गळतीचे प्रमाण अधिक असल्याने एमआयडीएस परिसरात धुक्यासारखे वातावरण निर्माण झाले होते.

gas leak in ambarnath midc
केमिकल कंपनीत गॅस गळती

By

Published : Sep 6, 2020, 6:37 AM IST

ठाणे - अंबरनाथ शहरातील आयटीआय मागे असलेल्या वडवली केमिकल कंपनीत मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. या गॅस गळतीमुळे परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गळती झालेल्या गॅसला उग्र वास असल्याने नागरिकांना खोकल्याचा आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. एवढेच नव्हे तर गॅस गळतीचे प्रमाण अधिक असल्याने एमआयडीएस परिसरात धुक्यासारखे वातावरण निर्माण झाले होते.

केमिकल कंपनीत गॅस गळती

अंबरनाथ शहरातील नेहरू उद्यानासमोरील काही कंपन्यांनी उग्र वास असलेला गॅस सोडल्याने स्वामीनगर, कानसई , साई सेक्शन, भीमनगर, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅसचे प्रमाण जास्त असल्याने सर्वत्र धुक्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. समोरचा व्यक्ती देखील दिसणार नाही. तेवढ्या प्रमाणात गॅसचा थर निर्माण झाला होता. या गॅसला उग्र वास असल्याने नागरिकांना त्याचा त्रास देखील सहन करावा लागला. या भागातील नागरिकांनी घरातील दारे-खिडक्या बंद करून या गॅस पासून वाचण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी मदतीसाठी प्रशासनाला बोलाविले. हा प्रकार पाहून अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशामक दल देखील घटनास्थळी रवाना असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केमिकल झोनमधील कंपन्यांना केमिकल प्रक्रिया बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तब्बल तासभर हा गोंधळ निर्माण झाला होता.

अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन-

याठिकाणी गॅस सोडण्याचे प्रकार नियमित घडत असल्याचा आरोप मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांनी केला. भोईर यांनी या गॅस गळती प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करून घटनेची माहिती दिली. तसेच आधीच अंबरनाथकर कोरोनाने त्रस्त्र आहेत. यात रोज अंबरनाथ एमआयडीसी मधील कंपन्या मधून मोठ्या प्रमाणात वायू गळती होत असते, एमपीसीबी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार अंबरनाथ मध्ये घडत आहेत. वेळीच संबिधत खात्याने दखल द्यावी , अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल, असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष भोईर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details