महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात स्कायवॉकचे पत्रे कोसळून घंटागाडी चालक जखमी - One injured due to falling metal sheet from Skywalk

स्कायवॉकच्या खालच्या बाजूचे ३ ते ४ पत्रे कोसळून एक पादचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील स्थानक परिसरात घडली. या घटनेमुळे स्कायवॉकच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Garbage  vehicle  driver was injured due to falling metal sheet from Skywalk
स्कायवॉकाचे पत्रे कोसळून घंटागाडी चालक जखमी

By

Published : Feb 28, 2020, 6:14 PM IST

ठाणे -स्कायवॉकच्या खालच्या बाजूचे ३ ते ४ पत्रे कोसळून एक पादचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिमेकडील स्थानक परिसरातील अनंत हलवाई दुकानासमोर घडली आहे. रवींद्र चव्हाण असे किरकोळ जखमी झालेल्याचे नाव असून तो महापालकेच्या घंटागाडीवर चालक म्हणून कार्यरत आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा स्कायवॉकच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्कायवॉकाचे पत्रे कोसळून घंटागाडी चालक जखमी

हेही वााचा - ठाणे परिवहन निवडणुकीसाठी अर्ज दाखल; जागांपेक्षा अर्ज जास्त आल्याने पक्षांची वाढली डोकेदुःखी

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी निधी खर्च करून एमएमआरडीएच्या माध्यमातून स्कायवॉक उभारण्यात आला. बस व रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी येण्याजाण्यासाठी स्कायवॉकाचा वापर करतात. विशेष म्हणजे हा स्कायवॉक उभारल्यापासून वादग्रस्त ठरला असून गेल्या दीड महिन्यात या स्कायवॉकचा पत्रा तुटून कोसळल्याची ही दुसरीघटना घडली आहे. यापूर्वीही अनेक वेळा या स्कायवॉकचे पत्रे कोसळले होते. स्कायवॉकचे सातत्याने पत्रे कोळण्याच्या घटनांमुळे स्कायवॉक खालून चालताना नागरिक जीव मुठीत धरून चालत आहेत.

हेही वााचा - अंबरनाथमध्ये दोन दुकानांसह घराला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

या स्कायवॉकचे चार जिनेही प्रवाशांना वापरासाठी धोकादायक झाल्याने बंद करण्याचा अहवाल काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील आयआयटी संस्थेने कल्याण डोंबिवली महापालिकेला दिला आहे. या पार्श्वभूमीवर केवळ जिनेच नव्हे तर या स्कायवॉकच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी बांधलेला हा स्कायवॉक महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इतक्या कमी काळात धोकादायक झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details