ठाणे - फिलिपाईन्समधून सुरेश पुजारीला दीड महिन्यापूर्वी ( Suresh Pujari Arrest in Philippines ) अटक करण्यात आली होती. त्याच्यावर ठाणे जिल्ह्यासह मुंबई परिसरात सुमारे ३८ गंभीर गुन्हे ( 36 cases on Gangster Pujari ) दाखल आहे. त्याला आज मुंबई आणल्यानंतर कल्याणमधील एका गुन्ह्यात त्याला ठाणे न्यायालयात हजर करून पोलिसांनी कल्याणात आणले होते. या गॅंगस्टरच्या गुन्हेगारीचा प्रवास 'वेटर ते खंडणीखोर' गॅंगस्टर कसा झाला यावर 'ई टीव्ही भारत'चे विशेष वृत्त ( Special news on Thane Gangster ) वाचा.
गॅंगस्टर होण्यापूर्वी बार आणि ढाब्यावर होता वेटर ...
उल्हासनगरमधील डायमंड बार आणि मंदाताईंच्या ढाब्यावर वेटर म्हणून काम करणारा सुरेश पुजारी ( Gangster Suresh Pujari Criminal life ) हा बघता बघता गॅंगस्टर आणि खंडणीखोर झाला. 1993 साली सुरेश पुजारीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा पहिला गुन्हा उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी परिसरात दाखल झाला. त्यानंतर 2002 मध्ये एका दरोडाप्रकरणी आणि अपहरण याप्रकरणी मुंबईच्या डीएननगर पोलीस ठाणे त्याला अटक केली. तर 2016 साली सुरेश पुजारीने अंधेरी येथे एक हत्या केली.
संबंधित बातमी वाचा-Gangster Suresh Pujari : गँगस्टर सुरेश पुजारी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात.. २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
1998 साली सुरेश पुजारीला झाली होती अटक
अनेक गुन्ह्यात हवा असलेल्या सुरेश पुजारीला 1998 साली तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे ( Former additional police commissioner Ashok Morale ) यांनी दोन गंभीर गुन्ह्यात अटक केली. अंडरवर्ल्डमध्ये नव्याने आपले बस्तान बसविलेल्या सुरेश पुजारी याच्यावर ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर तसेच मुंबई परिसरात एकूण 38 गुन्ह्यांची नोंद होती. तर 2016 च्या दरम्यान दाखल झालेल्या पाच गंभीर गुन्ह्यात सुरेश पुजारीला मोक्कांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ठाणे जिल्हा आणि मुंबईमध्ये अनेक बिल्डर व व्यापारी यांच्याकडून खंडणी मागण्याचे आणि धमकावण्याचे किंवा हत्या करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा-Fake Covid Vaccination Aurangabad : औरंगाबादेत पाचशे रुपयांत लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र, सरकारी डॉक्टरांसह चौघे अटकेत
गुन्हेगारी जगतात सुरेश पुजारीने असा केला प्रवेश-
केबल व्यावसायिकाची हत्या करून गुन्हेगारी जगतात पुजारीने प्रवेश केला. खंडणीखोर आणि गॅंगस्टर सुरेश पुजारीने स्वतःची टोळी बनवून खंडणी वसुलीचे सत्र सुरू केली आहे. त्याच्यावर खंडणी वसुली प्रकरणी, धमकावणे आणि खुनाचा प्रयत्न करणे अशा विविध गंभीर गुन्ह्यांची एक मालिकाच सुरेश पुजारी यांच्या नावाने विविध पोलिस ठाण्यात नोंद झाली. खंडणीखोर सुरेश पुजारीला फिलिपाईन्समध्ये अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. विविध गंभीर गुन्ह्यांच्या चौकशीसाठी पोलिसांनी सुरेश पुजारीला मुंबईला आणले.
हेही वाचा-Murder in Dharavi : उपचाराला पैसे नसल्याच्या वादातून सुनेने केली सासूची हत्या
अंडरवर्ल्डमध्ये नवा खंडणीखोर गॅंगस्टर आला उदयास ...
सुरेश पुजारीने ठाणे जिल्ह्यातील व्यापारी आणि बांधकाम व्यवसायिक यांना खंडणी मागून 'सळो की पळो' करून सोडले होते. गॅंगस्टर रवी पुजारीच्या टोळीचे अनेक वर्ष नेतृत्व केल्यानंतर सुरेश पुजारीने उल्हासनगरमधील केबल व्यवसाय करणाऱ्या सच्चानंद करीरा यांची हत्या केली. या हत्येनंतर रवी पुजारीचा बोलबाला असलेल्या अंडरवर्ल्डमध्ये एका नव्या खंडणीखोर गॅंगस्टरचा उदय झाला. खंडणी उकळणे आणि धमकावणे आदी तंत्रामध्ये तरबेज झालेल्या सुरेश पुजारीचा बोलबाला सुरू झाला. सुप्रसिद्ध गॅंगस्टर रवी पुजारी यांच्या टोळीतून बाजूला होऊन सुरेश पुजारीने आपले बस्तान मांडले. त्याने ठाणे जिल्हा टार्गेट करीत खंडणी सत्र सुरू केले. ठाणे जिल्ह्यातील बहुतेक व्यावसायिक आणि राजकारणी, धनाढ्य लोकांना खंडणीसाठी गॅंगस्टर सुरेश पुजारीचे फोन खणखणू लागले. अनेक शार्प शूटर यांचे जाळे सुरेश पुजारीने ठाणे जिल्ह्यात तयार करून आपले बस्तान मांडले.
व्यापारी बांधकाम व्यसायीकासह राजकारण्यांना धमक्यांचे फोन ...
ठाणे शहराव्यतिरिक्त, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कल्याण आणि उल्हासनगरसह नवी मुंबईच्या विविध भागात रवी पुजारी आणि सुरेश पुजारी यांच्याकडून पुनर्प्राप्तीसाठी अनेकांना धमकी देण्यात आली होती. सुरेश पुजारीने उल्हासनगर केबल व्यावसायिक सच्चानंद करीरा यांची हत्या केली. त्यानंतर उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनाही फोनवर धमकी दिली होती.
जितेंद्र आव्हाडसह भाजप आमदारालाही धमकी -
गँगस्टर सुरेश पुजारी हा विदेशात बसून ठाणे जिल्ह्यातील व्यापारी, बांधकाम व्यावसायीकांना धमकावून खंडणी वसूल करत होता. यापूर्वी अशीच धमकी त्याने युतीच्या काळात आमदार तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिली होती. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याबाबत कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याला आपण जबाबदार असल्याचे म्हटले होते. तर दोन वर्षांपूर्वीच कल्याण पश्चिमेकडील काशीष पार्कमध्ये राहणारे भास्कर शेट्टी या कँटीन व्यावसायिकाला गँगस्टर पुजारीने धमकावले होते. शेट्टी यांना फोन करणाऱ्याने आपण सुरेश पुजारी बोलत असल्याची ओळख दिली. बऱ्या बोलाने 25 पेट्या टाक, नाहीतर ढगात पाठवीन अशी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे शेट्टी यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ कल्याणचे आमदार गायकवाड यांनाही त्याने अशाच पद्धतीने धमकावले होते. त्यामुळे राजकीय व केबल व्यावसायिक मंडळींचे धाबे दणाणले होते.
गॅंगस्टर रवी पुजारीसारखीच, सुरेश पुजारीची खंडणी उकळण्याची स्टाईल
स्वतंत्र टोळीची निर्मिती केल्यानंतर सुरेश पुजारीने ठाणे जिल्ह्यात अनेकांना धमक्या आणि खंडणी वसुलीसाठी तगादा लावला होता. याच प्रकरणी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये सुरेश पुजारी च्या विरोधात खंडणी मागणे हत्येची धमकी देणे हत्येचा प्रयास करणे अशा विविध गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. मुंबई, नवी मुंबई ठाणे उल्हासनगर अंबरनाथ परिसरामध्ये आपल्या शार्प शूटरच्या माध्यमातून खंडणीचे सत्र सुरू केले. सुरेश पुजारीची कार्यपद्धतीही जवळपास खंडणीखोर गॅंगस्टर रवी पुजारीप्रमाणेच होती. प्रथम खंडणीसाठी डिमांड करणे, धमकी द्वारे इशारा देणे व त्यानंतर गोळीबार करणे, अशी कार्यपद्धती सुरेश पुजारीची ( Gangster crimes in Thane ) होती.
अंडरवर्ल्डचे अनेक वसुली बादशहा कारागृहात बंदिस्त ..
मुंबई पोलिसांनी सुरेश पुजारीला फिलीपाईन्समधून अटक केल्यानंतर चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. सुरेश पुजारीच्या चौकशीदरम्यान बहुतांश गुन्ह्याचा उलगडा होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान अंडरवर्ल्डचे बहुतांश गॅंगस्टर सध्या कारागृहात बंदिस्त आहेत. तर काही भूमिगत झालेले आहेत. कोरोनाच्या पूर्वीपासूनच अनेक गँगस्टरला अटक झाली. त्यामुळे खंडणीखोर सुरेश पुजारी याच्या मुसक्या आवळल्याने अंडरवर्ल्डचे जवळपास सर्व वसुली बादशहा हे कारागृहात बंदिस्त झाले आहेत.