ठाणे -भारत सोडून परदेशात गेलेल्या काही भारतीयांना इथले सण साजरे करण्याचा मोह आवरत नाही. दुबईतदेखील अनेक भारतीय आहेत. त्यापैकी काही जणांनी एकत्र येऊन दुबईच्या राजाची स्थापना केली आहे. दुबईतील महाराष्ट्र मंडळाने या राजाची गेली 46 वर्षे प्रतिष्ठापना केली. दुबईसारख्या मुस्लिम देशात हिंदू सण मोठ्या उत्साहाने हे भारतीय मंडळ साजरे करते. अल फहिदी भागात असलेल्या सिंधी सेरेमेनी सेंटरमध्ये या बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.
दुबईमध्ये साजरा होतोय गणेशोत्सव, भारतीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग - dubaicha raja
दुबईमध्ये महाराष्ट्र मंडळाकडून दुबईचा राजा या गणेशाची स्थापना केली जाते. ४६ वर्ष हा गणपती बाप्पा दुबईतील अल फहिदी भागात असलेल्या सिंधी सेरेमेनी सेन्टर मध्ये बसतो. हजारो लोक या गणेशाचे दर्शन घेतात.
दुबई मधील महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव
दररोज आरतीसाठी येथे 300 पेक्षा जास्त भाविक उपस्थित असतात. हजारो भाविक या बाप्पाचे दर्शन घेतात. मुख्य म्हणजे गणपतीची ही मूर्ती इको फ्रेंडली असून, तिचे दुबईच्या खाडीत वाजत गाजत विसर्जन केले जाते. फक्त भारतीयच नव्हे, तर नेपाळी, मलेशियन देशातील लोकदेखील या दुबईच्या राजाच्या दर्शनाला येतात. संदीप गुप्ते हे गेली अनेक वर्षे दुबईमध्ये राहतात त्यांनीच याबद्दल माहिती दिली.