महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तळोजात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, 2 महिन्यांपासून लटकले मृतदेह?

तळोजा फेज-१ मधील शिव कॉर्नर सोसायटीत चौघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या उपाध्याय कुटुंबातील चौघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

navi mumbai suicide news
ळोजा फेज-१ मधील शिव कॉर्नर सोसायटीत चौघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

By

Published : Feb 22, 2020, 4:17 PM IST

Updated : Feb 22, 2020, 5:50 PM IST

नवी मुंबई - तळोजा फेज-१ मधील शिव कॉर्नर सोसायटीत चौघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या उपाध्याय कुटुंबातील चौघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उपाध्याय हे पती-पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ळोजा फेज-१ मधील शिव कॉर्नर सोसायटीत चौघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

हे कुटुंबीय भारद्वाज यांच्या शिवकॉर्नर सोसायटी मधील डी-विंगच्या 502 क्रमांकाच्या सदनिकेत भाड्याने राहत होते. त्यांनी दोन महिन्यांचे घरभाडे न दिल्याने मालक स्वतः भाडे घेण्यासाठी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतरही आतमधून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्थानिकांच्या मदतीने कुलूप उघडले. यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. उपाध्याय कुटुंबीयांनी दोन मुलांसह गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. संबंधित आत्महत्या दोन महिन्यांपूर्वी झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सर्व मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले. प्रथम पतीने पत्नी व मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

सध्या फॉरेन्सिक टीम तपासासाठी दाखल झाली असून अधिक तपास सुरू आहे.

Last Updated : Feb 22, 2020, 5:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details