ठाण्यातील वेदांता रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार कोविड रुग्णांचा मृत्यू? चौकशीचे आदेश - वेदांता हॉस्पिटल
ठाण्यातील वर्तकनगर येथील खासगी वेदांता या कोविड रुग्णालयात सोमवारी पहाटे 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
![ठाण्यातील वेदांता रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार कोविड रुग्णांचा मृत्यू? चौकशीचे आदेश four corona patients die due to lack of oxygen](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11545292-102-11545292-1619438671522.jpg)
ठाणे - ठाण्यातील वर्तकनगर येथील खासगी वेदांता या कोविड रुग्णालयात सोमवारी पहाटे 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर, दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनीही रुग्णालयाला भेट देऊन चौकशी करून प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनीही रुग्णालयाच्या बेजबाबदारपणाचे हे मृत्यू असल्याचा आरोप केला असून सकाळीच ऑक्सिजन संपला असताना रुग्णालयाकडून ठाणे मनपा प्रशासनाला कळवले नसल्याचे म्हटले आहे.