ठाणे - येऊर या निसर्गरम्य परिसरातील नील तलावात अवघ्या २४ तासांत चार मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने ठाण्यात एकाच खळबळ उडाली आहे. रविवारी निल तलावात बुडून प्रसाद मधुकर पावसकर (१६) आणि जुबेर सय्यद, यांचा मृत्यू झाला. तर, रविवारीच लोकमान्य नगर, पाडा नं- ४, येथे राहणार सुतेश अर्जुन करावडे (३३) या तरुणाचा डबक्याच्या चिखलात फसल्याने मृत्यू झाला. तर, सोमवारी सकाळी याच तलावात तेजस प्रमोद चोरगे (१७) आणि ध्रुव कुळे, (१७) मित्रासह पोहण्यासाठी गेले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचाही बुडून मृत्यू झाला. पिकनिक स्पॉटवर बंदी असतानाही वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाल्याचे नागरिकांचे मत आहे.
अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घेतला सोध
सोमवारी येऊर पाटोणपाडा येथील नील तलावात पोहण्यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तेजस प्रमोद चोरगे (17), रा- आयाशा टॉवर, समता नगर, ठाणे आणि ध्रुव कुळे (17) साईबाबा मंदिर, वर्तक नगर, ठाणे हे दोघे आपल्या मित्रांसोबत येऊरच्या नील तलाव येथे पोहण्यासाठी गेले होते. निल तलावात प्रथम तेजस आणि ध्रुव या दोघांनी तलावात उडी घेतली. मात्र, त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यापैकी घटनास्थळी आलेल्या आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी सोध घेतला. दरम्यान, सोमवारी दुपारी २-३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह सापडला. सदर, तेजस याचा मृतदेह वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शव विछेदानाठी नेण्यात आला. तर, ध्रुव याचा मृतदेह अद्याप सापडला नसून, आपत्ती व्यवस्थापन टीम, अग्निशमन दल यांच्याकडून शोधण्याचे काम सुरू होते. अखेर, शोध पथकाने स्कुबा ड्राइव्हचा वापर करून, सोमवारी संध्याकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास ध्रुव याचा मृतदेह शोधला आहे. सदर, ध्रुवाचा मृतदेह वर्तकनगर पोलीसध्या स्वाधीन करण्यात आला आहे.