महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नववर्षाच्या पहाटे बँकेचे एटीएम फोडणारी चौकडी गजाआड - ATM theft news

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी जलद गतीने लावून चारही आरोपीना अटक केली आहे.

ATM
ATM

By

Published : Jan 2, 2021, 4:43 PM IST

Updated : Jan 2, 2021, 5:29 PM IST

ठाणे -नववर्षाच्या पहाटे अ‌ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हेगांराच्या चौकडीला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना गजाआड करण्यात यश आले आहे. विशेष उल्हासनगरमधील या वर्षातील पहिल्याच मोठ्या गुन्ह्याची घटना उल्हासनगर कॅम्प नंबर ४ परिसरात सतरामदास हॉस्पटिललगत असलेल्या अ‌ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी जलद गतीने लावून चारही आरोपीना अटक केली आहे. सागर सूर्यवंशी (वय २४), आशिष गौर (वय १९), केशव जगताप (वय २३), रोहित कहार (वय २४) असे गजाआड केलेल्या चौकडीचे नावे आहेत. विशेष म्हणजे हे चारही गुन्हेगार उल्हासनगर ४ नंबर येथील आशेळेगावातील त्रिमूर्ती चाळीत एकत्र राहतात.

एटीएम फोडतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

एकीकडे घराघरासह ठिकठिकाणी नवीनवर्षाच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत होत असताना पोलिसांच्या अटकेत असलेली गुन्हेगारांची चौकडी उल्हासनगर कॅम्प नंबर ४ परिसरात सतरामदास हॉस्पटिललगतचे अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपये लंपास करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न कैद झाला. त्यांनतर बँकेचे अधिकारी राजेश बोरकर (वय ३८, रा. डोंबिवली पूर्व) यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

१२ तासाच्या आता गुन्हेगारीची चौकडी अटक

पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिकबाबीचा तपास जलदगतीने सुरू केला. तर दुसरीकडे गुप्त बातमीदाराकडून पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांना माहिती मिळाली, की एटीएम फोडणारे चौकडी आशेळे गावातील नागरिकांनी मंदिरालगत अंधारात बसली आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून चौघाही आरोपींना १२ तासातच अटक केली आहे. आज चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.

Last Updated : Jan 2, 2021, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details