महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एटीएसने जप्त केलेल्या व्होल्वो कारची फोरेंसिक तपासणी सुरू - व्होल्वो कारची फोरेंसिक तपासणी सुरू

एटीएस टीमने दमन येथून व्होल्वो कार जप्त केली आहे. या कारचा वापर मनसुख यांच्या हत्येसाठी केला असावा, असा अंदाज एटीएसला आहे आणि म्हणूनच आता एटीएस या कारची फोरेंसिक तपासणी करत आहे. या कारसाठी आज पहाटे दमन येथे एटीएसने छापा टाकला होता.

Forensic investigation  begins of Volvo car seized
Forensic investigation begins of Volvo car seized

By

Published : Mar 23, 2021, 2:57 PM IST

Updated : Mar 23, 2021, 3:05 PM IST

ठाणे -आज पहाटे एटीएस टीमने दमन येथून व्होल्वो कार जप्त केली आहे. या कारचा वापर मनसुख यांच्या हत्येसाठी केला असावा, असा अंदाज एटीएसला आहे आणि म्हणूनच आता एटीएस या कारची फोरेंसिक तपासणी करत आहे. या कारसाठी आज पहाटे दमन येथे एटीएसने छापा टाकला होता. ही व्होल्वो कार (एमएच 05 डीएच 6789) जप्त केली आहे.

एटीएसने जप्त केलेल्या व्होल्वो कारची फोरेंसिक तपासणी सुरू

सूत्रांकडून असे समजते की, सचिन वाझेच्या पार्टनरची ही गाडी असल्याचे बोलले जात आहे. गाडीचा नेमका वापर काय आणि कशासाठी करण्यात आलाय, याचा तपास एटीएस करत आहे. मात्र तपासात व्होल्वो गाडीचा सारखा उल्लेख आल्याने एटीएसने कारवाई केली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर ठाणे एटीएसने दोन आरोपींना अटक केली आहे. काल देखील ठाणे एटीएसने अनेक ठिकाणी झडती घेतल्यानंतर आता मोठी कारवाई देखील केली आहे.

Last Updated : Mar 23, 2021, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details