महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dasara Melava 2022 : बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना खास मेजवानी ; मराठी उद्योजकाला फूड पॅकेट्सची ऑर्डर - बीकेसी येथील दसरा मेळावा

शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू (Dasara Melava at BKC) आहे. आणि यातच येणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलं अन्न खायला (treat for workers coming for Dasara Melava) मिळावं, या हेतूने ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये प्रसिद्ध अशा प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या मराठी व्यावसायिक असलेल्या प्रशांत सकपाळ यांना लाखो फूड पॅकेट्सची ऑर्डर दिली (food packets treat for Dasara Melava)आहे.

Dasara Melava 2022
दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना खास मेजवानी

By

Published : Oct 4, 2022, 2:01 PM IST

ठाणे :शिवसेना आणि वडापाव हे मागील अनेक वर्षांचा समीकरण यांना पाहायला मिळणार नाहीये, कारण यंदादसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना फूड पॅकेट मिळणार आहेत. शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू (Dasara Melava at BKC) आहे. यातच येणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलं अन्न खायला (treat for workers coming for Dasara Melava) मिळावं, या हेतूने ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये प्रसिद्ध अशा प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या मराठी व्यावसायिक असलेल्या प्रशांत सकपाळ यांना लाखो फूड पॅकेट्सची ऑर्डर दिली (food packets treat for Dasara Melava)आहे.

शिवसैनिकाला फूड पॅकेट -उद्या बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळव्यासाठी बीकेसी येथे येणाऱ्या सर्व शिवसानिकांची खाण्याची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आणि म्हणून प्रताप सरनाईक यांच्याकडून ठाण्यातील प्रसिद्ध आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानाला 2 ते अडीच लाख फूड पकेट्स ची ऑर्डर देण्यात आली आहे. या फूड पॅकेटमध्ये धपाटे, ठेपला, कचोरी, गुलाबजाम असे चविष्ट पदार्थ असणार आहेत. सभेत गेल्यावर प्रत्येक शिवसैनिकाला फूड पॅकेट दिले जाणार (food packets by Marathi entrepreneur) आहेत.



वडापाव अनेक वर्षांची परंपरा -दसरा मेळाव्यासाठी आणि इतर कोणत्याही मेळाव्यासाठी येणारा कार्यकर्त्यांची पहिली पसंती असते. ते गरमागरम वडापाव याचे मुंबईत होणाऱ्या अनेक सभांसाठी मेळाव्यांसाठी कार्यक्रमांसाठी मुंबईच्या नाक्यावर मिळणारा वडापाव, ही मुंबईकर आणि महाराष्ट्राची पसंती आहे. मात्र आता बदलत्या राहणीमानानुसार नेत्यांनाही आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी, अशा प्रकारे फूड पॅकेट्स द्यावे लागत आहेत. ज्याचा खर्च वडापावच्या मानाने चार पट आहे, मात्र त्यातून मिळणार समाधान देखील तेवढेच असल्याचे नेतेमंडळी सांगत (Dasara Melava 2022)आहेत.

दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना खास मेजवानी


शिवसेना आणि वडापाव समीकरण -महाराष्ट्रातल्या अनेक निवडणुका अनेक प्रचार अनेक सभा अनेक मेळावे, हे वडापाववरती काढण्यात आलेले आहे. आणि आजही अनेक शिवसैनिक आम्ही फक्त वडापाव वर काम करतो, हे देखील अभिमानाने सांगतात. वडापाव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असला, तरी आता एका मराठी उद्योजकाकडून मिळणारी ही खास मेजवानी वडापावला मागे सारण्याचा प्रयत्न करणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना खास मेजवानी



फूड पॅकेट चार दिवस टिकणार -हे फूड पॅकेट्स बनवताना अत्यंत विचार करून हे फूड पॅकेट्स बनवण्यात आलेले आहेत. त्यासाठी वाढू कामगारांची देखील गरज होती. आणि ती गरज ही पुणे सातारा या ठिकाणी असलेल्या कारागिरांकडून पूर्ण झाली आहे. धपाटे बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षित महिला यांना देखील प्रशांत कॉर्नर यांनी या कामात जुंपले आहे. हे फूड पॅकेट्स बनवताना हे पॅकेट चार दिवस खराब होणार नाही. आणि येणारा कार्यकर्ता आपल्या घरी जाऊन देखील ते खाऊ शकतो, याची विशेष काळजी घेण्यात आलेली (Dasara Melava) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details