महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Seized Bogus Edible Oil : दिवाळीपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने अडीच कोटींचा बोगस खाद्य तेलाचा साठा केला  जप्त - seized stocks of bogus edible oil in Thane

शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तेलाच्या 4 पेढ्यांमध्ये धाड टाकण्यात आली असून यात 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (seized stocks of bogus edible oil in Thane) यात एकूण ५४ नमुने घेण्यात आले व एकूण रुपये २ कोटी ४६ लाख ५०हजार ७५3 रुपयाचाचा उर्वरित साठा जप्त करण्यात आलेला आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन चे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे.

Seized Bogus Edible Oil Thane
Seized Bogus Edible Oil Thane

By

Published : Oct 14, 2022, 8:06 PM IST

ठाणे :दिवाळी निमित्त आपण सर्वच घरोघरी फराळ बनवत असतो व याच फराळ साठी आपण खाद्यतेल सुद्धा (edible oil adulteration) वापरतो. अनेक ठिकाणी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा करून ठेवतात. आपल्या शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तेलाच्या 4 पेढ्यांमध्ये धाड टाकण्यात आली असून यात 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (seized stocks of bogus edible oil in Thane)

बोगस तेलसाठा जप्तीप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देताना


अन्न व औषध प्रशासनाची माहिती :सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खाद्यतेल व दुग्धजन्य अन्नपदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात खाद्यतेल, वनस्पती इ. अन्नपदार्थामध्ये मेसळ होण्याची तसेच कमी दर्जाचे अन्नपदार्थ उप्तादन व विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदाई व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या करीता अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने अन आस्थापनांच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीसाठी घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत अन्नपदार्थाचे नमुने घेण्यात आले असून कायद्यातील तरतुदीचे उलंघन झाल्याचे आढळल्याने तसेच अन्नपदार्थाच्या बाबत साशंकता निर्माण झाल्याने संबंधित अन्न पदार्थाचा उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे. यात एकूण ५४ नमुने घेण्यात आले व एकूण रुपये २ कोटी ४६ लाख ५०हजार ७५3 रुपयाचाचा उर्वरित साठा जप्त करण्यात आलेला आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन चे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे.

बोगस खाद्य तेलाचा साठा जप्त


नावाशी मिळतेजुळते नाव :या फसवानुकीच्या प्रकारात नामांकित असलेल्या तेल कंपन्यांच्या नावाशी मिळते जुळते नाव ठेवून ग्राहकांची फसवणूक केली जाते ग्राहकांना पटकन ही फसवणूक लक्षात येत नाही आणि कमी प्रतीचे तेल नामांकीत तेलाच्या किंमतीत विकून ही फसवणूक सुरू आहे.अशाच प्रकारे कमी प्रतीच्या तेलाचा वापर केल्याने ग्राहकांच्या शरीर स्वास्थ बिघडू शकते म्हणून खरेदी करताना ग्राहकांनी सतर्क राहावे अशी प्रशासनाने विनंती केली आहे.

बोगस खाद्य तेलाचा साठा जप्त


सौंदर्य प्रसाधनात देखील :तेलाच्या फसवणुकीच्या प्रमाणेच सौंदर्य प्रसाधने देखील नामांकित नावाच्या प्रॉडक्ट्स ची कॉपी करून किंवा तशाच नावाचे साधर्म्य साधत ही सौंदर्य प्रसाधने विकली जात आहेत त्यावर देखील प्रशासनाकडून कारवाई केली जाते मात्र ग्राहकांनी सतर्क राहिल्यास ही फसवणूक थांबवता येते.

ABOUT THE AUTHOR

...view details