महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Child Dies Falling Terrace : ठाण्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू - ठाण्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू

पाच वर्षांच्या चिमुरड्याचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. श्लोक म्हात्रे असे या चिमुरड्याचे नाव ( Child Dies Falling Terrace In Thane ) आहे.

crime
crime

By

Published : Jun 15, 2022, 7:34 PM IST

ठाणे -येथील पाच वर्षांच्या चिमुरड्याचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. श्लोक किरण म्हात्रे, असे या चिमुरड्याचे नाव आहे. आजपासून शाळेची पहिली घंटा वाजणार होती. तर चिमुरडा हा जीवनाचे भविष्य बनविण्यासाठी शाळेची पहिली पायरी आज ( 15 जून ) चढणार होता. दरम्यान, ही दुर्दैवी घटना घडली. ठाण्याच्या पाचपाखाडी जवळ असलेल्या टेकडी बंगल्यात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना ( Child Dies Falling Terrace In Thane ) घडली.

ठाण्यातील टेकडी बांगला या ठिकाणी असलेल्या गीता अपार्टमेंट नावाच्या इमारतीत म्हात्रे कुटुंब तळ मजल्यावर राहतात. तर त्यांच्याच कुटुंबियांचे दुकान देखील याच इमारतीच्या तळमजल्यावर आहे. श्लोक म्हात्रे हा खेळता खेळता पाचव्या मजल्यावर गेला होता. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पाचव्या मजल्यावरुन पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्लोक हा पाचव्या मजल्यावर गेला कसा याबाबत माहिती मिळाली नाही. श्लोक म्हात्रे याचे शाळेत प्रवेश घेऊन शाळेचे दप्तर, गणवेश आदींची पूर्ण तयारी झालेली होती. दरम्यान, मंगळवारी श्लोकचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर, टेकडी बंगला परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कठडे नसलेले टेरेस धोकादायक - ठाण्यात अनेक इमारतींच्या टेरेसला सुरक्षा कठडे नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊ शकतात. इमारत बांधताना हे कठडे बांधने गरजेचे आणि बंधनकारक असल्याचे वास्तु विशारद सचिन पोतदार यांनी सांगितले आहे. मात्र, खर्च वाचवण्यासाठी अनेक नागरिक असे प्रकार करतात, ते त्यांच्या जिवनावर बेतत असल्याचे पोतदार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Kalyan Crime News : दीड वर्ष 7 जणांकडून लैगिंक अत्याचार; तरुणीची इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details