ठाणे काळी जादू Black magic आणि औषधी पदार्थच्या विक्रीसाठी medicinal products Sale दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची smuggling sand boa ७० लाखांत विक्री करणाऱ्या पाच तस्करांना Mandul snake smuggler arrest Thane कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी Khadakpada Police Station Kalyan सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून मांडूळ जातीचा वन्यसर्पसह गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाक्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश हीलि, चेतन कांबळे, अरविंद पंडित, विशाल ठाकरे, अनिल काटे असे अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत. मात्र सहावा तस्कर पोलिसांना गुंगारा देत फरार झाला आहे. Mandul snake smuggling arrest Thane
तस्करांना पकडण्यासाठी रचला पोलिसांनी सापळाकल्याण पोलीस परिमंडळ कार्यलयातील विशेष पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, रविवारी सायंकाळच्या सुमारास पडघा मार्गे काही तस्कर दुचाकीवरून दुर्मिळ मांडूळ जातीचा वन्यसर्प कल्याणात विक्री करणाऱ्यास येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदशनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शरद झिने, पोलीस उपआयुक्त विशेष पथकातील पोलीस कर्मचार संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरेसह पोलीस पथकाने रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पडघा – कल्याण मार्गावरील अग्रावाल कॉलेज नजीक सापळा रचला.