ठाणे: डोंबिवली जवळच असलेल्या संदप गावात खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. संदप गावासह आसपासच्या देसले पाडा, भोपर आदी परिसरात पाणी टंचाई आहे. त्यामुळे या भागातील नागरिक संदप गावातील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात. आज सायंकाळच्या ६ वाजल्याच्या सुमारास देसले पाडा येथील गायकवाड कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घडली.
पाणी टंचाईने घेतला बळी! खदानीत बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
डोंबिवली जवळच असलेल्या संदप गावात खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घडली.
एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हे मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपेक्षा गायकवाड (30), मीरा गायकवाड (55), मयुरेश गायकवाड (15), मोक्ष गायकवाड (13) निलेश गायकवाड (15) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते.
Last Updated : May 8, 2022, 7:38 AM IST