ठाणे - जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ठाणे शहरात रहाणाऱ्या एका ६० वर्षाच्या इसमाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला - ठाण्याच्या बी कॅबिन परिसरात रहाणारे ६० वर्षाचे नागरिक शनिवारी सकाळी स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने संध्याकाळी त्यांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, त्यांना मुंबईला घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्य झाला.